Header Ads Widget


कर्मसाक्षी प्रेमचंद जाधव शैक्षणिक संकुलात १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन विविध शाखा तर्फे उत्साहात साजरा ...

 


नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी/ प्रा. गणेश सोनवणे:शहादा येथील कर्मसाक्षी प्रेमचंद जाधव शैक्षणिक संकुलात १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन विविध शाखा तर्फे उत्साहात साजरा करण्यात आला.ध्वजारोहण शहादा शहरातील नवजीवन हॉस्पिटलचे प्रख्यात डॉक्टर हेमंत नेमाडे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे विश्वस्त व माजी उपनगराध्यक्ष इस्माईल मंसूरी सातपुडा शिक्षण संस्थेचे सचिव प्रा. संजय जाधव सोनामाई शिक्षण संस्थेच्या सचिव व जिल्हा स्काऊट आयुक्त वर्षा जाधव , प्रशासकीय प्रमुख प्रा हिमांशू जाधव ,तेरापंथी जैन समाज महिला मंडळ कार्यकर्त्यां सह विविध शाखांचे पदाधिकारी उपस्थित होते.उपस्थित मान्यवरांचे शैक्षणिक संकुलातर्फे सन्मान करण्यात आला.ध्वजारोहण नंतर विद्यार्थ्यांनी झेंडा गीत म्हणून भारत माता की जय-जय जवान जय किसान च्या घोषणा देण्यात आल्या. डॉक्टर हेमंत नेमाडे यांनी भारतीय स्वातंत्र्यदिनानिमित्त विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शारदा कन्या विद्यालयाचे शिक्षक एस.एस.मोरे यांनी केले.

Post a Comment

0 Comments

|