Header Ads Widget


खानदेशची कुलस्वामिनी आदिशक्ती कानुबाई मातेचे शहाद्यात जागर ...

 


नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी /प्रा. गणेश सोनवणे: डोंगर हिरवा गार,माय मना डोंगर हिरवागार.....,उदे गं अंबे उदे..., डोंगर नी पडीगई वाट...., छोटीशी कानबाई लाडाची माय, लाडाची.... असे एकाहून एक सरस व उभ्या महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेले कानुबाई मातेच्या गाण्यांवर उपस्थित हजारो प्रक्षेकांना थिरकायला लावले.निमित्त होते खानदेशची कुलस्वामिनी आदिशक्ती कानुबाई मातेच्या जागराचे. माणसा माणसांमध्ये एकोपा कायम राहावा आपसातील मतभेद विसरून सर्वांनी एकत्रित नांदावे यासाठी शहादा येथील सामाजिक कार्यकर्त्या प्रीती पाटील यांच्या संकल्पनेतून तसेच कानुबाई माता उत्सव समिती व अभिजीत दादा पाटील मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने खानदेशातील सुप्रसिद्ध संगीतकार आबा चौधरी सहकलाकार यांच्यासोबत शहरातील विकास हायस्कूलच्या प्रांगणात जागर कानबाई मातेचा हा भव्य कार्यक्रम झाला. खासदार गोवाल पाडवी, शहाद्याचे माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष मोतीलाल पाटील,देव मोगरा एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष राजेंद्रकुमार गावित, शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अभिजीत पाटील, नंदुरबारच्या माजी नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी,जिल्हा परिषद सदस्या ऐश्वर्यादेवी रावल, डॉ. समिधा नटावदकर, सातपुडा शिक्षण संस्थेचे सचिव प्रा.संजय जाधव, वर्षा जाधव, ज्योत्स्ना पाटील, सानिया राजपूत,डॉ. सुरेश नाईक,पंकज रावल यांसह विविध मान्यवरांसह मोठ्या प्रमाणावर महिला व पुरुष उपस्थित होते.कानुबाई मातेची विविधत स्थापना व विसर्जन....यावेळी सर्वप्रथम कानुबाई मातेची विकास हायस्कूलच्या मुख्य प्रवेशद्वारा वरुन वाजत गाजत मिरवणूक काढून पुरोहितांच्या मंत्रोच्चाराने विधिवत अभिजीत पाटील व प्रीती पाटील यांनी सपत्नीक पूजा विधी केली. यावेळी रोट (नैवेद्य )तसेच रुढीपरंपरेनुसार पारंपारिक साहित्यांची मांडणी करण्यात आलेली होती. रात्री कानबाई मातेच्या जागर करण्यात आला यावेळी शिरपूर येथील प्रसिद्ध संगीतकार आबा पाटील यांच्या गायनाचा कार्यक्रमा वेळी उपस्थित महिला व पुरुषांनी कानुबाई मातेच्या जागर गीतांवर धमाल केली. कार्यक्रमाचे सुरुवात राष्ट्रगीताने तर शेवटही राष्ट्रगीताने करण्यात आला.सकाळी गरबा नृत्याने कानुबाई मातेचे विसर्जन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विष्णू जोंधळे यांनी केले.


" कानुबाई मातेचा सार्वजनिक उत्सव प्रथमच होत आहे. प्रथा, परंपरा, संस्कृती टिकविण्यासाठी अभिजीत पाटलांनी चांगला उपक्रम सुरू केला आहे.यातून निश्चितच एकोपा निर्माण होऊन समाजात एक चांगला संदेश जाईल. संस्कृती जपण्यासाठी असे उपक्रम होणे गरजेचे आहे. "...... ऍड.गोवाल पाडवी (खासदार ),


" शहादा शहर सांस्कृतिक वारसा असलेले व जपणारे शहर आहे. २५-३० वर्षांपूर्वी शहराची वेगळी ओळख होती. मध्यंतरी संवेदनशील शहर म्हणून ओळखले जाऊ लागले. मुळात येथील जनता खूप प्रेमळ आहे. कानुबाई मातेच्या उत्सव हा परिवाराला एकत्रित आणतो.शहर सुद्धा एक परिवार आहे.या जागराचा निमित्ताने सर्व समाज एकत्रित करण्याच्या प्रयत्न.शहराची वेगळी सांस्कृतिक ओळख निर्माण करण्याच्या या प्रवासात शहरात देश घडविणारी पिढी तयार होईल अशी सामूहिक प्रार्थना कानुबाई मातेला करण्यात आली. "...... अभिजित पाटील ( सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती, शहादा )

Post a Comment

0 Comments

|