Header Ads Widget


बांगलादेशात झालेल्या आत्याचार निषेधार्थ शहादा शहरात जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला आहे.

 

   


शहादा प्रतिनिधी /प्रा. गणेश सोनवणे:बांगलादेशात गत आठवडाभर पुर्वी हिंदू बांधव महिला युवती यांच्यावर अमानुष अत्याचार केले आहे. तरुणीवर बलात्कार करत नग्न अवस्थेत गावात मिरवले लहान लहान बालकांचे हत्या, देवालयावर हल्ला, जाळपोळ केला असे अनेक प्रकार मुद्दामून जिहादांनी  हिंदुना टार्गेट केले याचा निषेध म्हणून शहादा येथील समस्त हिंदू समाजाच्या वतीने शहर बंदचे आवाहन केले असता  शहरातील व्यापारींनी प्रतीसाद देत सर्व व्यवहार दिवसभर  बंद ठेवल्याने शहरात रस्त्यावर शुकशुकाट होते. दुपारी तीन वाजेच्या सुमारास भव्य जन आक्रोश मोर्चात हजारो हिंदू बाधव उपस्थित होते. बांग्लादेशात राहणारा हिंदु हा आपलाच आहे आणि तिथल्या हिंदुंची हत्या म्हणजे जगातल्या हिंदूंची हत्या, महिलांवर होणारा बलात्कार, लहान बालकांची हत्या, हिंदु मंदिरावर हमले, जाळपोळ घरलुटने, हिंदुंची दुकान लुटने असे अनेक प्रकार जाणुन बुजुन घडवुन आणले फक्त आणि फक्त जिहाद हिंदुंना टारगेट करणे हाच उद्देश समोर ठेवला आहे. संपूर्ण भारतात या घटणेचां निषेध व्यक्त केलेला आहे. नंदुरबार जिल्हा सकल हिंदू समाजाच्या वतीने शुक्रवारी बंदचे आवाहन करण्यात आले होते.  शहादा शहर व तालुक्यात बंदला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला आहे. सकाळी सात वाजल्यापासून गजबजणारा भाजीपाला मार्केट, डोंगरगाव रस्ता,मारवाडी व्यापारी मार्केट, मोहिदा  रोड, महात्मा ज्योतिबा फुले स्मारक लगतचा भाग, भगवा चौक, खेतिया चार रस्ता, मेन रोड, काझी चौक, सोनार गल्ली, महाराणा प्रताप चौक येथे दिवसभर शुकशुकाट होता. कृषी उत्पन्न बाजार समितीचे पुरुषोत्तम पाटील मार्केट नंबर एक दोन तीन, खरेदी विक्री संघाचे शाँपींग काँम्पलेस बागुल मार्केट, सरदार वल्लभभाई पटेल मार्केट, नगर पालिकेच्या कै. काशिनाथ पाटील मार्केट, बोहरी मार्केट, जाधव बंधु मार्केट, अदि भागातील सर्वच दुकानदारांनी व्यवसाय, तसे दैनंदिन रस्तालगत ठेला गाडी लावत व्यवसाय करणारे गाडी वाल्यंयांनी, रस्त्यावर बसुन व्यवसाय करणारे दुकानदारांनी उत्स्फुरतीने बंद ठेवून निषेध नोंदविला आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या लालपरीत सकाळ पासून सुरळीत सुरू होत्या प्रवाशांचा प्रवास सुकर सुरु होता. नंदुरबार जिल्हा बंदची हाक सोशल मीडियात फिरत राहील्याने ग्रामीण भागातुन सकाळी सकाळी येणारे लोक आले नाहीत. ग्रामीण भागातुन शहरात शिक्षणासाठी बसने प्रवास करणारे विद्यार्थी संख्या शाळेत नगण्य राहीली आहे. बंद मुळे प्रवाशी नसल्याने सर्व बसेस मध्ये प्रवाशी नसल्याने राज्य परिवहन मंडळाच्या मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. दरम्यान दुपारी तीन वाजेच्या सुमारास शहरातील श्री राम मंदिर पासुन जन आक्रोश मोर्चा रुट केला होता हातात बांगला देशात हिंदू लोकांनावर  महिलांवर निर्मनुष्य अत्याचार केलेल्या निषेधार्थ फलक झळकत होते. बांगलादेशात हिदू समाजातील महीला तरुणीवर अत्याचार व देव देवतांचा मंदीराची तोडफोड करण्यात आली याचा निषेधार्थ बांगलादेशचे सरकारचा विरोधात घोषणा देत हिंदु बांधावरील अत्याचार थांबवावे अशा आशयचे  निवेदन शहादा उपविभागीय प्रांताधिकारी सुभाष दळवी यांना देण्यात आले. यावेळी बजरंग दल जिल्हाध्यक्ष राजा साळी, डॉ कांतीलाल टाटिया, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील, अजय शर्मा, राजेंद्र अग्रवाल, तुषार पाटील, माजी नगरसेवक ज्ञानेश्वर चौधरी, दिनेश खंडेलवाल, गुड्डु पवार, दिनेश नेरपगार, लक्ष्मीकत अग्रवाल, संजय कासोदेकर, माजी नगरसेवक ज्ञानेश्वर चौधरी, सामाजिक कार्यकर्ते यशवंत चौधरी, शिवसेना शहराध्यक्ष रोहन माळी, अनिल भामरे, डॉ विजय कलाल, ह भ प खगेन्द्र महाराज सह सकल हिंदू समाजातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते 

... दुचाकीस्वार मोटरसायकल रँलीचे आयोजन..

  शहर बंदचे आवाहन केल्या नंतर शहरातील हुतात्मा लालदास देसाई स्मारक पासुन पस्तीस- चाळीस दुचाकी मोटारसायकलस्वार यूवकांने रँलीचे आयोजन करण्यात आले होते .  भारत माता की जय, जय श्री राम, जय भवानी जय शिवाजी नामाच्या गजर करीत बाईक रँली सोनार गल्ली, भोई गल्ली, तूप बाजार, काझी चौक, मेन रोड, चौधरी गल्ली, खेतिया चार रस्ता, शहादा उपविभागीय प्रांताधिकारी कार्यालय समोरुन, डोंगरगाव रस्त्यालगत, बस स्थानक समोरील, दोंडाईचा रोड, महात्मा ज्योतिबा फुले चौक, प्रेस मारुती मंदीर मुख्य प्रवेशद्वारा समोरून भगवा चौक सप्तशृंगी माता मंदिर याप्रमाणे काढण्यात आला 


 ........... भव्य आक्रोश मोर्चा.............. 

 दरम्यान दुपारी तीन वाजता श्री राम मंदिर पासुन जन आक्रोश मोर्चा प्रारंभ झाला होता. यात शहरातील कल्पेश पटेल, मोतीलाल जैन, डॉ. किशोर पाटील, माजी नगरसेवक सुपडू खेडकर, संजय साठे,डॉ.हेमंत सोनी, तुषार पाटील सह साधु संत पुरोहीत, लहान मोठे व्यापारी, काँलेजचे तरूण तरूणी, माता भगीणी, वयोवृद्ध,डाँक्टर, अध्यक्ष,गणेश मंडळ विविध क्षेत्रातील लोक मोठय़ा संख्येने उपस्थित होते. जन आक्रोश मोर्चा दरम्यान कायदा व सुव्यवस्था प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी शहादा उपविभागीय पोलिस अधिकारी दत्ता पवार, पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत, म्हसावद पोलीस निरीक्षक राजन मोरे, शहादा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी यांनी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. 

 

 

 

 

 

 

 

Post a Comment

0 Comments

|