Header Ads Widget


एससीआरटीचे संचालक राहुल रेखावार यांच्या हस्ते प्राचार्य डॉ. सतीश पाटील संपादित पुस्तकाचे पुणे येथे प्रकाशन...

 



  नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी/प्रा.गणेश सोनवणे:तंबाखुमुक्त अभियानासाठी 'तंबाखूमुक्त अभियान आव्हाने आणि उपाययोजना' हे पुस्तक प्रेरणादायी ठरेल असे प्रतिपादन एससीआरटीचे संचालक राहुल रेखावार यांनी केले.

     ईगल लिप प्रिंटर्स व पब्लिकेशन पुणे प्रकाशित व मुख्य संपादक प्राचार्य डॉ.सतीश पाटील (श्रीमती मनकर्णाबाई विनायकराव मराठे शिक्षणशास्त्र महाविद्यालय पिंपळनेर) यांच्यासह सहसंपादक शिक्षक बाबाराव डोईजड,शिक्षिका मनिषा देवरे,प्राचार्य डॉ.संध्या पटेल संपादित 'तंबाखूमुक्त अभियान आव्हाने आणि उपाययोजना' या प्रबोधनात्मक संशोधन पुस्तकाचे प्रकाशन महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहुल रेखावार यांच्या हस्ते करण्यात आले.याप्रंसगी मुख्य संपादक प्राचार्य डॉ.सतीश पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी तंबाखूमुक्त शाळा अभियानात केलेल्या कार्याबद्दल प्राचार्य डॉ.सतीश पाटील व त्यांच्या सहकाऱ्याचे कौतुक केले.सदर पुस्तक प्रबोधनासाठी व जनजागृतीसाठी उपयुक्त असून संशोधनात्मक पुस्तक प्रेरणादायी ठरेल असे संचालक राहुल रेखावार यांनी शुभेच्छा देतांना सांगितले.संशोधन पुस्तकातून संपादक मंडळ व लेखकांनी शैक्षणिक क्षेत्रात,गावात तंबाखू मुक्त शाळा,महाविद्यालय,शिक्षकांनी आपल्या राबविलेल्या वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमांचे संशोधनात्मक लेखन व अभियानाच्या निकषपूर्तीच्या नाविन्यपूर्ण व अभ्यासपूर्ण प्रबोधन व जनजागृतीच्या दृष्टीने महत्वपूर्ण ठरणाऱ्या या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पुणे येथे मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.या पुस्तकात समाविष्ट असलेल्या तंबाखू व्यसनाचे दुष्परिणामांची व त्यामुळे होणाऱ्या शारीरिक व मानसिक हानीची व व्यसनाच्या उच्चाटनासाठी कोणकोणत्या उपाययोजना व उपक्रम प्रभावीपणे राबविणे गरजेचे आहे याची संशोधनात्मक माहिती तंबाखुमुक्त अभियान आव्हाने आणि उपाययोजना या संशोधन पुस्तकात मांडणी केलेली आहे.तंबाखूमुळे आरोग्यावर होणारा परिणाम, व्यवस्थापन,तंबाखूमुक्त शाळा उपक्रमाची फलश्रुती,तंबाखूमुळे होणारे परिणाम व उपाययोजना,शैक्षणिक चळवळ,तंबाखूमुक्त शाळा,गावाची यशस्वीता, निकषपूर्तीचे आव्हाने व उपाययोजना,शारीरिक व मानसिक परिणाम,महाराष्ट्रातील शिक्षकांना उपक्रम दिशा देण्याचे उत्कृष्ट कार्य,शिक्षक,विद्यार्थी, शाळा यांना या उपक्रमाचा फायदा होत आहे.नवनवीन सामाजिक, शैक्षणिक उपक्रम तंबाखूमुक्त शाळा आयोजित केले आहेत.प्रत्यक्ष शाळेत व महाविद्यालयात राबविलेल्या तंबाखुमुक्त उपक्रमांचे शैक्षणिक कार्याची दखल देऊन व यशस्वीपणे अंमलबजावणी केली व पुस्तकाची निर्मीती केली. या संशोधनपर पुस्तकाला एससीआरटीचे संचालक राहुल रेखावार यांनी शुभेच्छा देत संशोधन कार्यातून जनजागृतीपर मांडणी केली असून तंबाखुमुक्त अभियानात डॉ.सतीश पाटील यांनी केलेले कार्य उल्लेखनिय आहे असे म्हटले.दरम्यान, उपसंचालक यशदा डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी,यशदाचे निंबधक मंगेश जोशी, उपसंचालक शोभा खंदारे, उपसंचालक कमलादेवी आवटे,बालभारतीचे संचालक यांचे स्वीय सहाय्यक माळी साहेब,कै.आ.मा.पाटील पब्लिक एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सुरेंद्रराव मराठे,माजी आ.प्रा.शरद पाटील,धुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष माजी आ.राजवर्धन कदमबांडे,आ.कुणाल पाटील,संचालक कुणाल गांगुर्डे,संचालक जयेश मराठे,संचालक यजुवेन्द्र गांगुर्डे यांनी पुस्तकास शुभेच्छा दिल्या आहेत.

Post a Comment

0 Comments

|