Header Ads Widget


शेवाळीत हज यात्रेकरूंचा ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला सत्कार....


साक्री प्रतिनिधी/अकिल शहा:
एकीकडे देशात काही राजकारणी आपल्या स्वार्था साठी हिंदू मुस्लीम करून आपली राजकीय पोळी शेकण्यासाठी आपसात वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असतांना धुळे जिल्हयातील साक्री तालुक्यातील शेवाळी(दा.) गावात नेहमी प्रमाणे हिंदू आणि मुस्लिम समाज बांधव गुण्या गोविंदाने राहत असुन एकमेकांच्या सुख दुःखात सहभागी होत सामाजिक एकोपाचा संदेश देत आहेत. गावातील काही सामाजिक कार्यकर्ते विविध उपक्रम(उदा. गणपती उत्सव, छत्रपती शिवाजी महाराज जयंती, दिवाळी, रमजान ईद, फिरत्या नारळाचा कार्यक्रम) राबवून जुन्या वाड वडिलांची परंपरा पुढे नेण्याचा प्रयत्न करीत आहेत.असाच एक उपक्रम गावातील ग्रामसुधार मंडळ व बजरंग मित्र मंडळातर्फे जि.प.केंद्र शाळेच्या प्रांगणात घेण्यात आला. या वेळी गावातील मुस्लीम बांधवातील मुसा सय्यद शहा व त्यांच्या पत्नी (बानो शहा) व साबेरा इसा शहा हे मुस्लीम धर्मियांचे पवित्र स्थान असलेल्या मक्का आणी मदिना या हज यात्रेसाठी रवाना होत असल्याने त्यांचा गावातील प्रतिष्ठित नागरिकांच्या वतीने गुलाब पुष्प, शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. या वेळी शेवाळी गावातील ग्रामसुधार मंडळाचे अध्यक्ष, सचिव, सदस्य,बजरंग मिञ परीवार, मुस्लीम समाज बांधव व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

|