Header Ads Widget


छायाचित्रद्वारे फोटोग्राफर जनतेसमोर वस्तुस्थिती मांडतो:- तहसीलदार साहेबराव सोनवणे.

                      


साक्री प्रतिनिधी/अकिल शहा:
छायाचित्रकार फोटो काढतो त्या वेळची वस्तूस्थिती फोटोचे नेमके महत्त्व समाजापुढे मांडण्याचा विचार करतो आजच्या युगात आधुनिकी करन मोठ्या प्रमाणात झाल्याने छाया चित्रा तून बातमीचे महत्त्व कळते असे प्रतिपादन तहसीलदार साहेबराव सोनवणे यांनी साक्रीत आयोजित केलेल्या जागतिक छायाचित्र दिनानिमित्त कार्यक्रमात केले.                                   

    साक्री तालुका फोटोग्राफर असोसिएशन संघटनेच्या वतीने जागतिक छायाचित्रण दिनाचे आयोजन कर्मवीर नगर येथे करण्यात आले होते तहसीलदार साहेबराव सोनवणे जिल्हा परिषद सदस्य व विरोधी पक्ष नेते पोपटराव सोनवणे यांच्या हस्ते कॅमेरा पूजन आणि वृक्षारोपण करण्यात आले या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापक नरेंद्र तोरणे सयाजीराव अहिरराव व्ही एस भदाणे नगरसेवक प्रतिनिधी स्वप्निल भावसार आदी मान्यवर उपस्थित होते.             तहसीलदार साहेबराव सोनवणे यांनी मनोगत व्यक्त करताना पुढे सांगितले की मोबाईल फोटोग्राफीमुळे मूळ फोटोग्राफी वर परिणाम झाला आहे काही वर्षांपूर्वी फोटोग्राफीला फारच महत्त्व होते मोबाईलच्या युगात होणाऱ्या छायाचित्रणाचे दुष्परिणाम आज पाहायला मिळत आहेत.फोटोग्राफीचे महत्व खूप आहे याचे महत्त्व विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून दिसून येत असल्याचे त्यांनी आपल्या मनोगत मधून मांडले..अध्यक्ष अमृत सोनवणे,उपाध्यक्ष विजय येळीस,राजेंद्र सावळे,नंदलाल पवार,दीपक जाधव,कपिल बेडसे,भूषण अहिरे ज्येष्ठ पत्रकार जी.टी.मोहिते प्रकाश वाघ,शरद चव्हाण, रतणलाल सोनवणे किशोर गादेकर, ज्ञानेश्वर ढालवाले तालुक्यातीलफोटोग्राफर भूषण सोनवणे प्रतापूर,प्रवीण खैरनार,निलेश पवार भावेश तोरवणे ,विजय येळीस,भूषण अहिरे साक्री,योगेश सावळे,भावेश सोननीस,जयेश गरदरे उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक नरेंद्र तोरवणे तसेच सूत्रसंचलन पत्रकार प्रकाश वाघ तर , साक्री तालुका फोटोग्राफर संघटना अध्यक्ष अमृत सोनवणे यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे आयोजन जितेंद्र जगदाळे यांनी केले .

Post a Comment

0 Comments

|