Header Ads Widget


हर घर तिरंगा अभियान अंतर्गत विद्यार्थ्यांची भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन...

 


नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी/प्रा. गणेश सोनवणे:शहादा येथील वसंतराव नाईक व शारदा कन्या विद्यालय तर्फे हर घर तिरंगा अभियान अंतर्गत विद्यार्थ्यांची भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली.परिसरातील नागरिकांनी तिरंगा रॅलीचे उत्साहाने स्वागत केले. सातपुडा शिक्षण संस्थेचे सचिव प्रा. संजय जाधव व सोनामाई शिक्षण संस्थेच्या सचिव वर्षा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली रॅलीचे आयोजन करण्यात आलेले होते.तिरंगा रॅलीची सुरुवात कर्मसाक्षी प्रेमचंद जाधव शैक्षणिक संकुलापासून करण्यात आली.तिरंगा रॅली महालक्ष्मी नगर तैलिक मंगल कार्यालय नितीन नगर पतंजली नगर मार्गे शैक्षणिक संकुलाच्या आवारात विसर्जित करण्यात आली.विद्यार्थ्यांनी भारत माता की जय जय जवान जय किसान हर घर तिरंगा नावाच्या घोषणा दिल्या.विद्यार्थी व विद्यार्थिनींच्या हातात तिरंगे होते.विद्यार्थ्यांमध्ये कमालीच्या उत्साह होता. तिरंगा राहिलेत विद्यार्थ्यांसमवेत वसंतराव नाईक विद्यालयाचे प्राचार्य महेंद्र मोरे उप मुख्याध्यापक जे.एम. पाटील उपप्राचार्य जे.बी.पवार पर्यवेक्षक अनिल खेडकर ए. ए.खान शारदा कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका एस.झेड.सैय्यद पर्यवेक्षक आर.एफ.पाटील व शिक्षक तसेच शिक्षिका सहभागी झाल्या होत्या.

Post a Comment

0 Comments

|