Header Ads Widget


सौ. मोनिका पुष्पलाल भंडारी यांचे मासश्रमण तप महोत्सव कार्यक्रम..

 


नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी /प्रा. गणेश सोनवणे : शहादा येथील धान्य मार्केटचे व्यापारी पुष्पलाल भंडारी यांची धर्म पत्नी सौ मोनिका पुष्पलाल भंडारी यांनी गेल्या 28 दिवसाच्या निरंकट तप साधना करून तपस्या केली.शहादा येथील तेरापंथी भवनात प.पूज्य 1008 आचार्य श्री महाश्रमणजी महाराज साहेब यांच्या अज्ञानुवृती प.पूज्य श्री प्रज्ञाश्रीजी म.सा.आदी ठाणा 4 यांच्या प्रबळ प्रेरणेने भंडारी परिवारांची सून सौ मोनिका भंडारी यांनी तपसाधना करीत 28 दिवस निरंकट उपाशी राहिली त्याबद्दल शहाद्यात त्यांच्या तप साधण्याचे विषयी चर्चा सुरू आहे. भगवान महावीरांच्या दाखवीलेल्या मार्गाने संपुर्ण जैन समाज या चार महिन्याच्या कालावधीत तप साधना करीत असतात आणि त्या तप साधनांमध्ये अनेक साधक तप करून आपल्या कर्माची निर्जरा करीत असतात.तपसाधना करणे ही सोपी गोष्ट नाही मात्र असे गुरु भगवंतांचे सानिध्य लाभले तर ती तप साधना परिपूर्ण होते. शहादा येथील जैन समाजात त्रिवेणी चातुर्मास सुरू आहे . त्रिवेणी ठिकाणी तपसाधना करीत मोठ्या संख्येने साधक दिसत आहे.सौ मोनिका पुष्पलाल भंडारी यांच्या तप साधना निमित्त दिनांक 16 ऑगस्ट रोजी दुपारी 1 वाजता विमलनाथजी मंदिर , जुना मोहिदा रस्ता रोड येथून सप्तशृंगी माता मंदिराच्या मागे अतिथी बँकेट हॉल येथे संपन्न होणार आहे.तसेच 2 वाजता त्यांचे तपस्याचे पचख्यान ठेवण्यात आले आहे तदनंतर भावाचे गीत सायंकाळी 7.30 वाजता राजस्थान पाली येथील उदित भाटिया यांच्या मधुर आवाजात भक्ती संध्याचे कार्यक्रम ठेवण्यात आलेले आहे.तर सर्वांनी या ठिकाणी यावे. असे आव्हान जैन तेरापंथी सभेचे अध्यक्ष कैलास संचेती तर मंत्री पुष्पलाल भंडारी यांनी केले तर माहिती जैन समाजाचे युवा मंत्री भवरलाल जैन यांनी दिली.

Post a Comment

0 Comments

|