Header Ads Widget


निजामपूर पोलिसांची दमदार कामगिरी ;सुरतच्या भंगार व्यवसायिकास लुटणारे दोघांना अवघ्या दोन तासात केले गजाआड...

 


साक्री प्रतिनिधी /अकिल शहा
: जामदे ता.साक्री जि. धुळे येथे काही दरोडेखोरांनी सुरतच्या एका भंगार व्यवसायिकासह अन्य दोघांना सुमारे 300 टन भंगार असल्याचे गावात बोलवून त्यांना मारहाण करीत पैसे लुटल्याची घटना घडली होती.निजामपूर पोलीसांनी अवघे दोन तासात लुटीच्या घटनेतील दोघे संशयितांना जेरबंद केले.सुरत येथील भंगार व्यवसायिक पुनीत शर्मा व सोबत असलेले दोघांना 300 टन भंगार असल्याचे सांगून तीन ते चार दरोडेखोरांनी जामदे ता.साक्री जि.धुळे गावात बोलविले तसेच त्यांना जंगलात घेवून दोरीने बांधून जबर मारहाण करीत त्यांचेकडील असलेले पैसे व सोने बळजबरीने हिसकावून लुट केली. सदर घटनेची माहिती मिळताच निजामपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मयुर भामरे यांच्यासह शोधपथकाने लुटीच्या गुन्ह्याचा तांत्रिक पध्दतीने उलगडा करीत संशयित रोहित अमीर चव्हाण (वय32) रा.जामदे,ता.साक्री) भुऱ्या निला भोसले (वय32) रा.जामदे ता.साक्री) या दोघांना ताब्यात घेत विचारपुस केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.इतर आरोपीतांचा पोलीस शोध घेत आहेत. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे,साक्री उपविभागीय पोलीस अधिकारी संजय भांबळे यांचे मार्गदर्शनाखाली निजामपूर पोलीस ठाणेचे प्रभारी मयुर भामरे,उपनिरीक्षक प्रदीप सोनवणे,विशाल पाटील, पोहेकॉ माळचे,अहिरे, शिंदे,पवार,चालक देवरे यांनी केली आहे.  या घटनेतील इतर संशयितांचा शोध पोलीस घेत आहे.याप्रकरणी निजामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास निजामपूर पोलीस ठाण्याचे पोलिस उपनिरिक्षक सोनवणे करीत आहेत.



Post a Comment

0 Comments

|