Header Ads Widget


साने गुरूजी महाविद्यालयात वेटलिफ्टिंग स्पर्धा संपन्न...

 


नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी /प्रा. गणेश सोनवणे:
पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय येथे शालेय जिल्हास्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धा उत्साहात संपन्न झाली.

        जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, शहादा यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धा घेण्यात आल्या .

स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या कल्पना पटेल होत्या व प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एम.के.पटेल, वेटलिफ्टिंग खेळाचे विद्यापीठ खेळाडू निलेश ढोले,उपप्राचार्य डॉ.एस.डी.सिंदखेडकर, पर्यवेक्षक प्रा.के.एच.नागेश, महाविद्यालयाचे क्रीडा संचालक प्रा.डॉ.अरविंद कांबळे ,क्रीडा समितीचे अध्यक्ष प्रा.डॉ.महेश जगताप ,स्पर्धा संयोजक जितेंद्र माळी,घनश्याम चौधरी,सुनील गुरखा आदी मान्यवर उपस्थित होते. स्पर्धेचे उद्घाटन वेटलिफ्टिंग खेळाचे साहित्याचे पूजन करून व श्रीफळ वाढवून करण्यात आले.अभ्यासासोबत खेळ खेळणं खूप महत्त्वाचे आहे. जेणेकरून शारीरिक व मानसिक संतुलन संतुलित ठेवता येते व आपले आरोग्य चांगले राहते. त्याचबरोबर अनेक स्पर्धा परीक्षेत विद्यार्थ्यांना राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्तरावरील प्रमाणपत्रामुळे खेळाडू आरक्षणातून नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी असते. म्हणून आपल्या आरोग्यासाठी व पुढील वाटचालीसाठी खेळ खेळणे महत्त्वाचे आहे,असे प्रतिपादन उपप्राचार्या कल्पना पटेल यांनी खेळाडूंना शुभेच्छा देतांना केले.स्पर्धेत पंच म्हणून जितेंद्र माळी, घनश्याम चौधरी, खलील शेख, सुनील गुरखा, प्रमोद सोनार यांनी काम पाहिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जितेंद्र माळी यांनी केले व आभार प्रा. डॉ. अरविंद कांबळे यांनी मानले.स्पर्धा यशस्वीतेसाठी कार्यालयीन अधिक्षक सुनिल भांडारकर, दिलवर ठाकरे,संजय विसावे, आशिष सोनवणे,खलील शेख आदींनी काम पाहिले.

Post a Comment

0 Comments

|