Header Ads Widget


दिव्यांगांच्या कल्याणाच्या विशेष योजनांच्या बाबतीत मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन...

 


नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी/ प्रा.गणेश सोनवणे:
दिव्यांगांच्या कल्याणाच्या विशेष योजनांच्या बाबतीत मार्गदर्शन कार्यक्रमाचे नवीन तहसील कार्यालय सभागृह शहादा येथे दिनांक 12/ 08 / 2024 ला , सोमवारी रोजी, ठिक -11-00 वाजता सुभाष दळवी, उपविभागीय अधिकारी - शहादा यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेले होते.

      या विशेष उपक्रमामध्ये दिव्यांगांच्या विशेष योजनांचे संबंधित अधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन करण्यात आले,महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने दिव्यांग व्यक्तींकरिता शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध योजना, महसूल विभागाशी संबंधित विविध दाखले व प्रमाणपत्रे उपलब्ध करून देणे या योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या लाभाच्या अनुषंगाने तालुकास्तरावरील शिबिरांत दिपक गिरासे तहसीलदार यांनी संजय गांधी निराधार अनुदान योजना, मुख्यमंत्री लाडकी बहिण व अंत्योदय योजना अशा विविध योजनांचे मार्गदर्शन केले व त्यांचा लाभ घेण्याचे आवाहन केले, या विषयावर कोणत्याही प्रकारची अडचण असेल तर दिव्यांग बांधवांनी व भगीनींनी मलाही भेटलेत तरी काही अडचण नाही. या कार्यक्रमाच्या आयोजनात स्वयंसेवी संस्थांची मदत घेत उपक्रम राबविण्यात यावेत असे शासनाचे निर्देश असल्याने म्हणून अपंग क्षेत्रातील 40 वर्षाचे अनुभवी शिवाजीराव मोरे, राज्य उपाध्यक्ष - राष्ट्रीय अपंग विकास महासंघ, महाराष्ट्र राज्य यांनी सांगितले की दिव्यांगांना विविध योजनांचे लाभ मिळून देण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी तळमळीने व अथक परिश्रमातून आज जेही लाभ मिळता आहेत ते फक्त आणि फक्त महासंघामुळेच त्यासाठी आम्हाला न्याय हक्क मिळवून देण्यासाठी मुंबई हायकोर्टात याचिकाही दाखल कराव्या लागल्यात महाराष्ट्र शासनास कृती आराखडा मंजूर करून घेणे, 5 टक्के निधी मंजूरी असेल, आरक्षण असेल, संजय गांधी योजनेचे अनुदान वाढ असेल हे आम्ही मंजूर करून घेतले असे सांगितले. शहादा तालुक्यातील दिव्यांग बांधवांना व भगीनींना मोठ्या संख्येने उपस्थित होते. या विशेष कार्यक्रमात संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे मंजुरी आदेशांचे प्रमुख अतिथींच्या हस्ते वाटप करण्यात आले.

       तसेच या कार्यक्रमाचे औचित्य साधत संकल्प ग्रुप - शहादा अध्यक्ष पिनाकिन पटेल,जितेन्द्र ललवाणी, सौरभ जहागीर व राकेश कोचर यांनी सहकार्य केले,तसेच पाण्यापासून बचाव व्हावा म्हणून सर्व दिव्यांग बांधवांना छत्र्यांचे वाटप संकल्प ग्रूप तर्फे करण्यात केले आणि विविध सेवा गोरगरिबांना उपलब्ध करून देत आहोत असे राकेश कोचर यांनी सांगितले, संजय गांधी योजनेअंतर्गत मिळणाऱ्या अनुदाना विषयी व ज्या बांधवांना अनुदान मिळत नाही किंवा बंद झाले आहे , अशांच्या ज्याही काही अडचणी असतील त्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले , तसेच अनाथ मुलांना महिला बालकल्याण योजनेअंतर्गत जे मासिक अनुदान योजना राबवली जाते आहे, त्या योजनेचा अशा निराधार बालकांना लाभ मिळणेसाठी माहिती देण्यात आली, असे माननीय तहसीलदार दीपक गिरासे शहादा यांनी आवाहन केलेले आहे.  तरी मोठ्या संख्येने शहादा शहरातील व शहादा तालुक्यातील सर्व दिव्यांग बांधवांनी व भगिनींनी उपस्थित आपल्या विविध अडचणी या कार्यक्रमाचे अनुषंगाने मांडाव्यात व त्या त्वरित सोडवण्यात येतील असे प्रयत्न संबंधित अधिकाऱ्यांकडून केले जाणार आहेत.कार्यक्रम यशस्वीसाठी श्री शैलेंद्र गवते, प्रकाश धनगर, ना तहसीलदार शहादा, तलाठी मंडळी व संजय गांधी विभागाचे कर्मचारी वृंद लाभले

Post a Comment

0 Comments

|