Header Ads Widget


शहादा महाविद्यालयात विद्यापीठ वर्धापन दिन व नामविस्तार दिन साजरा....

 


नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी/प्रा. गणेश सोनवणे:
पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव व महाविद्यालयाच्या विद्यार्थी विकास विभाग व राष्ट्रीय सेवा योजना विभाग अंतर्गत विद्यापीठ वर्धापन दिन व नामविस्तार दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. एम. के.पटेल लाभले होते. तर प्रमुख वक्ते म्हणून वसंतराव नाईक महाविद्यालयाचे मराठी विभागाचे डॉ. आर. डी.पाटील होते.मान्यवरांनी कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात केली. प्रमुख वक्ते डॉ.आर डी पाटील यांनी विद्यापीठाला कवयित्री बहिणाबाई चौधरी नामकरणाची पार्श्वभूमी सांगितली. कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे कार्य व त्यांचे काव्य सर्व समाजासाठी प्रेरणादायी आहे. त्यांनी आपल्या काव्यातून जीवनाचे तत्वज्ञान मांडले आहे. शेतात राबतांना, जात्यावर काम करतांना त्यांनी कविता लिहिल्या.त्यांनी बहिणाबाईंच्या विविध कवितांचे दाखले देऊन ओघवत्या भाषेत महत्त्व पटवून दिले. सर्वांनी बहिणाबाईंसारखे काव्यमय जीवन जगावे व जीवनात प्रयत्नशील राहावे असे सांगितले. अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ.पटेल यांनी सांगितले की, बहिणाबाईंचे काव्य म्हणजे महाराष्ट्राला लाभलेली अमूल्य देणगी आहे. त्यांचे नाव विद्यापीठाला देऊन खानदेश कन्येचा गौरव करण्यात आला आहे. सर्वांनी त्यांचे विचार अंगीकारावे व जीवन जगावे असे सांगितले.कार्यक्रमाचे आयोजनासाठी संस्थेचे अध्यक्ष बापूसाहेब दीपकभाई पाटील, उपाध्यक्ष जगदीशभाई पाटील, मानद सचिव श्रीमती कमलताई पाटील, समन्वयक प्रा .मकरंद पाटील, संचालक मयूरभाई दीपक पाटील, प्राचार्य डॉ. एम. के. पटेल व उपप्राचार्य डॉ. एस. डी. सिंदखेडकर यांनी मार्गदर्शन केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. आर. एस. माळी व राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रमुख डॉ. वजिह अशहर व सहकारी यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचलन डॉ. आर. एस.माळी यांनी केले तर आभार डॉ. वजिह अशहर यांनी मानले.

Post a Comment

0 Comments

|