Header Ads Widget


जागतिक अवयवदान दिना निमित्त निबंध स्पर्धा....

 


 नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी/प्रा. गणेश सोनवणे:मृत व्यक्तीच्या अंत्यसंस्कारात शरीरातील चांगले अवयव जाळुन टाकण्यापेक्षा त्यांनी अवयवदान केल्यास मरनाच्या अवस्थेत असलेली माणसे पुन्हा चांगले आयष्य जगू शकतात म्हणुन अवयव दान हे कार्य खुप महत्वाचे कार्य आहे पण त्याबाबत अज्ञान ,भीती व गैरसमज खुप आहेत ते दूर व्हावे म्हणून साने गुरुजी मित्र मंडळ शहादा तर्फे सर्वोदय विद्यालय व कै एस बी पटेल ज्युनिअर कॉलेज प्रकाशा येथे अवयव दान एक महत्त्वाचेदान याविषयी निबंध स्पर्धा घेण्यात आली या स्पर्धेत एकुण 74विद्यार्थ्यानी भाग घेतला होता.या कार्यक्रमात सर्व प्रथम साने गुरुजी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले,कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी डॉ शशांक कुलकर्णी होते तर प्रमुख पाहुणे धुळे येथील गुजर समाजाचे अध्यक्ष प्रकाश पाटील, साने गुरुजी मित्रमंडळाचे अध्यक्ष माणक चौधरी, जायंन्टस ग्रुप चे अध्यक्ष डॉ विवेक पाटील, सहेली अध्यक्षा स्वाती पाटील, धुळ्याच्या कविता पाटील,सचिव गुलाबराव पवार, प्राचार्य शरद पाटील आदी उपस्थित होते. यावेळी डॉ विवेक पाटील म्हणाले की देशात दर वर्षी दिड लाख लोकांची किडनी निकामी होतात त्यांना किडनीची गरज असताना फक्त पाच हजार लोकांना किडनी मिळते म्हणुन अवयव दान बाबत जनजागृती करने आवश्यक आहे ते कार्य साने गुरुजी मित्रमंडळ शहादा हे छान करीत आहे.या वेळी प्रकाश पाटील डॉ शशांक कुलकर्णी यांनीही मार्गदर्शन केले या निबंध स्पर्धेत प्रथम येणारा विध्यार्थी तेजल ईश्वर पाटील व्दितीय एकता परेश खिलोसिया तृतीया ईशान श्रीपत पाटील तर उत्तेजना विद्या गोरख भोई, ओम सुधाकर मराठे, हितेश सुभाष गोसावी, खुशी प्रदिपसिंग राजपूत, साक्षी प्रकाश पाटील यांची निवड करुन मान्यवरांचां हस्ते त्यांचा सन्मानपत्र व बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक माणक चौधरी, सूत्रसंचलन छाया पाटील आभार गुलाबराव पवार यांनी मानले.



Post a Comment

0 Comments

|