Header Ads Widget


डॉ. बाबासाहेब आबेडकर समाजकार्य महाविद्यालय मोराणे येथे, नशा तंबाखू मुक्त अभियान कार्यक्रम संपन्न...



मोराणे /प्रतिनिधी :
मोराणे येथील डॉ.बाबासाहेब आबेडकर समाजकार्य महाविद्यालय मोराणे,धुळे येथे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव, विद्यार्थी विकास विभाग व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विदमाने महाविद्यालयात मादक पदार्थाच्या गैरवापरास प्रतिबंध करण्याकरिता व भारताला अंमली पदार्थ मुक्त बनविण्याच्या दुर्ष्टीकोनातून केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्रालयामार्फत नशा मुक्त भारत अभियान अंतर्गत शाळा, महाविद्यालय, विद्यापीठ व संवेदनशील क्षेत्र इत्यादी प्रमुख ठिकाणी विदयार्थी,युवक,युवती,खेळाडू अधिकारी आदी.चा सहभाग घेवून महाविद्यालयात 12 ऑगस्ट 2024 रोजी अंमली पदार्थ विरुद्ध प्रतिज्ञा घेण्यात आली.या अभियानाप्रसंगी अभियानाचे व कार्यक्रमांचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य मा.प्रा.डॉ.विष्णू गुंजाळ हे अध्यक्ष स्थानी होते.त्यासोबच विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.डॉ.राजेंद्र बैसाणे,राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.राहुल आहेर व नोकरी संबंधी मार्गदर्शन केंद्र समन्वयक प्रा.डॉ.सुदाम राठोड कार्यक्रमाला उपस्थित होते.  अभियानाचे व कार्यक्रमांचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य मा.प्रा.डॉ.विष्णू गुंजाळ यांनी आपल्या मार्गदर्शनात नशा मुक्त भारत अभियान संदर्भातील धोरण व मार्गदर्शक बाबींबाबत महत्वपूर्ण भूमिका विशद केली. नशा मुक्त भारत अभियान म्हणजे काय ? नशा मुक्त भारत अभियान हा आपल्या समाजातील विविध घटकांमध्ये घुसखोरी करणाऱ्या अमली पदार्थांच्या दुरुपयोगाच्या गंभीर समस्येकडे लक्ष देण्याचा प्रयत्न करतो. NMBA एका बहुआयामी धोरणावर आधारित आहे ज्यात व्यसनाच्या विळख्यात अडकलेल्या व्यक्तींचे पुनर्वसन करण्यासाठी व्यावहारिक उपायांसह जागरूकता निर्माण करण्याच्या प्रयत्नांना एकत्र केले जाते. शाळा, विद्यापीठे, समुदाय आ यांना लक्ष्य करून, या उपक्रमाचे उद्दिष्ट एक व्यापक नेटवर्क तयार करणे आहे जे केवळ मादक द्रव्यांच्या दुरुपयोगाला प्रतिबंधित करत नाही तर पुनर्प्राप्तीसाठी शोधत असलेल्यांना देखील समर्थन देते.नशामुळे होणारे शारीरिक परिणाम सरांनी आपल्या मार्गदर्शनात करून दिले. सिगारेट ओढणे, दारू पिणे, वा अन्यमादक पदार्थांचे सेवन करणे, मावा (सुगंधी तंबाखू) खाणे इत्यादींमुळे दात, घसा, फुप्फुसे, हदय, जठर, मूत्रपिंडे, तसेच श्वसनसंस्था आणि पचनसंस्था यांचे विकार होऊन कर्करोग व इतर भयंकर रोग होतात. व्यसनांचे मानसिक दुष्परिणाम होवून व्यसनांमुळे मन व बुद्धी अकार्यक्षम बनून मानसिक त्रास होतो.म्हणून कोणत्याच विद्यार्थ्यांनी व्यसन व नशा करू नये.सदर कार्यक्रमांसाठी 52 विद्यार्थी उपस्थित होते.या कार्यक्रमांचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन विश्वजीत वाघ याने केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.राहुल आहेर यांनी विशेष परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments

|