Header Ads Widget


पूज्य साने गुरुजी महाविद्यालयात लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त अभिवादन.

 


 


   


 नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी/प्रा. गणेश सोनवणे:पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळ येथील कला ,विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयात लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.

यावेळी लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याविषयी कार्यक्रमाच्या अध्यक्षा कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या प्रा .सौ.कल्पना पटेल यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.त्यांनी म्हटले,थोर पुरुषांच्या पाऊलखुणा अमिट असतात. त्यांचे विचार हृदयात जपून जीवन प्रवास करावा. यातूनच खरा आदर्श नागरिक निर्माण होतो.आजच्या गतिमान जीवनात शिक्षणाबरोबर संस्काराची गरज आहे.असेही त्यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले. यावेळी कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा.के.एच नागेश, प्रा. व्ही.सी.डोळे यांच्यासह प्राध्यापक बंधू-भगिनी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा.उर्मिला पावरा तर आभार प्रा. योगिता पाटील यांनी केले.


Post a Comment

0 Comments

|