Header Ads Widget


पीएसजीव्हीपी मंडळाच्या वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थी संवाद कार्यक्रम संपन्न.

 



नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी/प्रा. गणेश सोनवणे:शहादा येथील पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे कला,विज्ञान व वाणिज्य वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्रातर्फे करिअर कट्टा उपक्रमांतर्गत विद्यार्थी संवाद कार्यक्रम महात्मा गांधी सभागृहात संपन्न झाला.

      याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्राचे अध्यक्ष यशवंत शितोळे हे उपस्थित होते.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एम. के.पटेल हे होते. प्रमुख अतिथी म्हणून नंदुरबार येथील जीटीपी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम.जे. रघुवंशी हे उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे संयोजक डॉ. खुमानसिंग वळवी यांनी केले. आपल्या मार्गदर्शनपर भाषणात यशवंत शितोळे म्हणाले की, आजचे युग मोबाईलचे आहे. मोबाईल मुळे जगभराची माहिती आपल्याला उपलब्ध होत आहे. विद्यार्थ्यांनी मोबाईलचा वापर अतिरेक न करता योग्य पद्धतीने स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासाठी करायला हवा.त्यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत भर पडू शकेल.प्राचार्य डॉ. एम. जे. रघुवंशी विद्यार्थ्यांशी हितगुज साधकांना म्हणाले की, तंत्रज्ञानाच्या युगामध्ये मोबाईलचा योग्य वेळी आपल्या भविष्यातील करिअर संधीचा पाठलाग करण्यासाठी वापर करावा. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. एम. के. पटेल यांनी करियर कट्टा उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी या स्पर्धेच्या युगात योग्य पद्धतीने अभ्यासाचे नियोजन करून स्पर्धा परीक्षांना सामोरे जायला हवे.महाविद्यालयातील करियर कट्टा हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या विकासासाठी आहे.त्यामुळे विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा असेही प्राचार्य डॉ. एम. के. पटेल म्हणाले. उपप्राचार्य डॉ .एस.डी. सिंदखेडकर व कनिष्ठ विभागाच्या उपप्राचार्य कल्पना पटेल, कॅप्टन एस. एल. भालेराव, डॉ. पी. आर. तोरवणे व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक वृंद आदी उपस्थित होते.महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचे कौतुक व स्वागत मंडळाचे अध्यक्ष बापूसाहेब दीपकभाई पाटील, उपाध्यक्ष जगदीश पाटील, सचिव श्रीमती कमलताई पाटील, समन्वयक प्रा. मकरंद पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मयूरभाई दीपक पाटील यांनी केले.कार्यक्रमास वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. वजीह अशहर यांनी केले तर डॉ. जी. एस. पाटील यांनी आभार व्यक्त केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.

Post a Comment

0 Comments

|