Header Ads Widget


वसंतराव नाईक माध्यमिक विद्यालय शहादा येथे लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विविध स्पर्धा आयोजित...

        

   


नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी /प्रा.गणेश सोनवणे:एक ऑगस्ट 2024 वसंतराव नाईक माध्यमिक विद्यालय शहादा येथे लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या प्रथम प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले याप्रसंगी संस्थेचे प्रशासकीय प्रमुख प्रा हिमांशू जाधवप्राचार्य एम. बी. मोरे उप प्राचार्य जी.बी. पवार व उपमुख्याध्यापक जे. एम. पाटील पर्यवेक्षक ए.डी. खेडकर व ए. ए. खान उपस्थित होते प्रथम पाचवी व सहावीसाठी प्रश्नमंजुषा ही स्पर्धा घेण्यात आली यात एकूण 40 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला यात प्रथम- हसनैन मुर्तुजा शेख इयत्ता सहावी/ ब तर द्वितीय यश प्रमोद भोई इयत्ता पाचवी/ब दुसऱ्या गटात - इयत्ता सातवी व आठवीच्या गट यात 41 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला प्रथम कार्तिक कन्हैयालाल ढोडरे इयत्ता आठवी/ ब व द्वितीय जयेश भैय्या पाटील आठवी/ ब यांची निवड करण्यात आली तर इयत्ता नववी व दहावीसाठी वकृत्व स्पर्धा- घेण्यात आली या स्पर्धेत एकूण 32 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला यात प्रथम- नचिकेत सुरेश शिरसाठ दहावी/ ब व पार्थ गणेश सोनवणे नववी /ब तर द्वितीय गौरव खगेंद्र कुंभार दहावी /ब व उत्तेजनार्थ मनीष मनोहर जाधव नववी/ ब सूत्रसंचालन वाडीले जे.ए. तर परीक्षक म्हणून . नेरकर पी.बी. व .पावरा व्ही.एस. यांनी काम पाहिले. इयत्ता अकरावी व बारावी साठी निबंध स्पर्धा घेण्यात आली यात एकूण 35 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी पटेल एस .जे. शिंदे पी.डी. पिंजारी एन. के. श्रीमती निकम एम. आर. श्रीमती पाटील एस.व्ही. श्रीमती निंभोरे मॅडम , राठोड आर.डी. यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments

|