Header Ads Widget


मामाचे मोहिदा तालुका शहादा येथेलोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाच्या ठिकाणी त्यांच्या जयंतीनिमित्त मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन ...

 


नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी/ प्रा.गणेश सोनवणे:मामाचे मोहिदा तालुका शहादा येथे दिनांक १ ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता गावातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाच्या ठिकाणी त्यांच्या जयंतीनिमित्त मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.तालुक्यातील शेकडो कार्यकर्ते उशिरा सायंकाळपर्यंत स्मारकाच्या ठिकाणी अभिवादनासाठी आले होते. यावेळी माकपाचे तालुकाध्यक्ष व शेतमजूर युनियनचे जिल्हाध्यक्ष कॉ. सुनील गायकवाड माजी उपसरपंच पुरुषोत्तम पाटील सतिलाल महिरे कॉ. संतोष गायकवाड ग्रामपंचायत सदस्य प्रकाश गिरासे सह प्रतिष्ठित नागरिक ग्रामपंचायत सदस्य मातंग व दलित समाजाचे ज्येष्ठ कार्यकर्ते उपस्थित होते.नंदुरबार जिल्ह्यात शहादा तालुक्यातील मामाचे मोहिदा येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे एकमेव भारत असल्याने अभिवादनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.स्मारक परिसर सुशोभित करण्यात आलेला होता.  यावेळी बोलतांना कॉ. सुनील गायकवाड यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी संघर्षमय लढा दिला.जनजागृती केली.लोकगीतांच्या माध्यमातून जनसामान्यात चांगले संस्कार उजवले.त्यांनी दिलेली शिकवण सगळ्यांनी आचरणात आणावी तसेच सर्वसामान्यांसाठी योगदान द्यावे असे आवाहन केले.या व्यतिरिक्त सतीलाल महिरे यांनी देखील मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक कॉ. सुनील गायकवाड यांनी केले.

Post a Comment

0 Comments

|