Header Ads Widget


संयुक्त शिक्षक- पालक व माता पालक मेळाव्याचे आयोजन...

 


नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी /प्रा. गणेश सोनवणे: शिक्षक-पालक व माता पालक शैक्षणिक दृष्ट्या अतिशय महत्त्वाचा दुवा असून प्रत्येक पालकांनी आपल्या पाल्यांकडे कटाक्षाने लक्ष देणे गरजेचे आहे.संस्थेच्या प्रगतीच्या वाटेत पालकांसोबत माझ्या शिक्षकांच्या देखील मोठा वाटा आहे असे प्रतिपादन शहादा तालुका एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष व माजी नगराध्यक्ष मोतीलाल पाटील यांनी केले.येथील शहादा तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित शेठ व्ही.के.शहा विद्यालय व (कै.)जी.एफ.पाटील कनिष्ठ महाविद्यालय व शेठ व्ही. के. शहा प्राथमिक विद्यालय यांच्या संयुक्त शिक्षक- पालक व माता पालक मेळाव्याचे आयोजन केले होते. त्यात कार्यक्रमाचा अध्यक्ष स्थानावरून मोतीलाल पाटील बोलत होते.यावेळी प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे उपाध्यक्ष हिरालाल पाटील ,सातपुडा शिक्षण संस्थेचे समन्वयक व सेवानिवृत्त प्राचार्य संजय राजपूत, प्राचार्य सुरेखा पाटील,मुख्याध्यापिका शोभना पटेल, मुख्याध्यापक विशाल तांबोळी,उपमुख्याध्यापक एस. आर. जाधव, शिक्षक-पालक व माता पालक संघाचे उपाध्यक्ष ,सदस्य व विविध विद्या शाखांचे पर्यवेक्षक,पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी वर्षभरात विविध परीक्षेसह दहावी व बारावी तसेच विविध क्षेत्रात स्पर्धा परीक्षांमध्ये तसेच क्रीडा क्षेत्रांमध्ये नैपुण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रशस्तीपत्र पुस्तके तसेच पदक देऊन गौरवण्यात आले.गुणवंत विद्यार्थ्यांसमवेत त्यांच्या पालकांच्या देखील सन्मान करण्यात आला.नंतर शिक्षक-पालक व माता पालक संघाची नूतन कार्यकारणी जाहीर करण्यात आली.नूतन कार्यकारिणीचे स्वागत करण्यात आले.यावेळी पालकांनी आपले मनोगत व्यक्त करून काही सूचना मांडल्या.पुढे बोलतांना मोतीलाल पाटील यांनी शैक्षणिक क्षेत्रात खाजगी शाळांमुळे स्पर्धा वाढली आहे.शिक्षण क्षेत्रात स्पर्धा ही गुणात्मक असली पाहिजे.संस्थेचे हजारो विद्यार्थी उच्च पदावर कार्यरत आहेत तर परदेशात देखील लौकिक मिळत आहेत.त्यांचे देखील अप्रत्यक्षरीत्या संस्थेला योगदान मिळत आहे.सध्या कोणत्याही प्रकारचे अनुदान मिळत नसल्याने शैक्षणिक संस्था चालवणे कठीण झाले आहे.आम्ही शेतकरी असून प्रामाणिकपणे संस्थेसाठी विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी योगदान देत आहोत. त्यासाठी पालकांसह सगळ्यांचे योगदान आवश्यक आहे.पालकांनी आपल्या मुलांकडे लक्ष देणे गरजेचे आहे असे सांगून शुभेच्छा दिल्या.तर उपाध्यक्ष हिरालाल पाटील यांनी शिक्षकांनी अध्यापनात चांगले योगदान द्यावे.आदर्श विद्यार्थी घडवावे.संस्कारक्षम विद्यार्थी संस्थेच्या नावलौकिक करतात.संस्थेमार्फत जास्तीत जास्त सुविधा देण्याचे प्रयत्न केले जात आहेत.पालकांनी जागृत राहणे गरजेचे आहे.सध्या स्पर्धेचे युग असून आपला पाल्य कसा टिकेल यासाठी प्रयत्न करावा असे आवाहन केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व अहवाल वाचन प्राचार्य सुरेखा पाटील यांनी केले.शिक्षक पालक संघाची भूमिका उपमुख्याध्यापक सुरेश जाधव यांनी मांडली.संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विष्णू जोंधळे यांनी केले तर आभार प्राथमिक विद्यालयाचे शिक्षक संजय पाटील यांनी मानले.कार्यक्रमाला शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

|