Header Ads Widget


कर्मसाक्षी प्रेमचंद जाधव जाधव शैक्षणिक संकुलात विविध शाखांमध्ये दिनांक ९ ऑगस्ट विश्व आदिवासी दिवस मोठ्या उत्साहाने साजरा...

 


नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी/प्रा.गणेश सोनवणे:शहादा येथील कर्मसाक्षी प्रेमचंद जाधव जाधव शैक्षणिक संकुलात विविध शाखांमध्ये दिनांक ९ ऑगस्ट विश्व आदिवासी दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.

         सोनामाई महिला महाविद्यालयात विश्व आदिवासी दिवसानिमित्त सातपुडा शिक्षण संस्थेचे सचिव प्रा. संजय जाधव व सोनामाई शिक्षण संस्थेच्या सचिव व जिल्हा स्काऊट-गाईड आयुक्त वर्षा जाधव यांच्या हस्ते स्नेह भित्तिपत्रकाचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी प्राचार्य डॉ. व्ही.एस.पाटील सह समितीचे सदस्य उपस्थित होते.प्रथम मान्यवरांच्या हस्ते आदिवासी क्रांतिकारी बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.स्नेह भित्तिपत्रकात विविध आदिवासी क्रांतिकारकांचे छायाचित्र इंग्रजांच्या विरोधात दिलेला लढा व ऐतिहासिक माहिती विद्यार्थिनींनी सादर केलेली होती.

               प्रास्ताविक व सूत्रसंचालन कु.सायमा शहा हिने केले तर उपस्थितांचे आभार कु.जमुना भिल हिने व्यक्त केले.प्रा. डॉ.अनिल साळुंखे यांनी आदिवासी क्रांतिकारकांची संपूर्ण माहिती दिली. वसंतराव नाईक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मुख्याध्यापक महेंद्र मोरे यांच्या हस्ते क्रांतिकारी बिरसा मुंडा व क्रांतिकारी तंट्या भिल यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.यावेळी उपमुख्याध्यापक जे.एम.पाटील उपप्राचार्य जे.बी.पवार पर्यवेक्षक अनिल खेडकर ए.ए.खान सहशिक्षक तसेच सांस्कृतिक समिती सदस्य उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन संजय बोरसे यांनी केले.तर आदिवासी दिनाचे महत्त्व एम.टी.सूर्यवंशी यांनी सांगितले.

       शारदा कन्या माध्यमिक विद्यालयात आदिवासी दिनानिमित्त सातपुडा शिक्षण संस्थेचे सचिव प्रा. संजय जाधव सोनामाई शिक्षण संस्थेच्या सचिव वर्षा जाधव यांच्या हस्ते क्रांतिकारी बिरसा मुंडा व तंट्या भिल यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.यावेळी संस्थेचे समन्वयक संजय राजपूत माजी प्राचार्य आर.जे.हूरेज मुख्याध्यापिका एस.झेड.सैय्यद उपस्थित होते.सूत्रसंचालन शिक्षिका जे.एफ.गावित यांनी केले तर उपस्थितांचे आभार पी.जी.वळवी यांनी व्यक्त केले.

Post a Comment

0 Comments

|