Header Ads Widget


गुरू गोरक्षनाथ मंदिराचे महंत योगी संजूनाथ महाराज यांनी कावड यात्रेचे स्वागत करत पूजाअर्चा करून कावड यात्रेकरूंनी आणलेल्या जलाने विधीवत अभिषेक करण्यात आले...

 


नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी/ प्रा. गणेश सोनवणे: महाराष्ट्रातील क्रमांक दोनचे थंड हवेचे ठिकाण असलेले तोरणमाळ येथील भगवान गोरक्षनाथ मंदिरात शिवशंभो भोलेनाथ.....हर हर महादेव.....गुरू गोरक्षनाथ महाराज की जयजयकार करत योगी महंत संजूनाथ महाराज यांच्या हस्ते कावड यात्रेकरूंनी आणलेल्या जलाचा अभिषेक करण्यात आला. यावेळी झालेल्या जयघोषाने नवचैतन्य निर्माण होवून मंदिर परिसर दणाणून गेला होता. 

          तोरणमाळ (ता.अक्राणी) येथे नाथ संप्रदायाचे मुकुटमणी चैतन्य गुरू भगवान गोरक्षनाथ महाराज यांचे ऐतिहासिक मंदिर असून येथे पवित्र श्रावण महिन्यात सटाणा तालुक्यातील जायखेडा येथून दरवर्षी कावड यात्रेकरूंची मोठी पदयात्रा मुख्यप्रवर्तक उमेश गुरव जायखेडकर यांंच्या मार्गदर्शनाखाली येते. जायखेडा येथून मोक्षगंगा नदीचे पवित्र जलाचे यशोदा आक्का यांच्या हस्ते पूजन करून टाळ-मृदंगाच्या गजरात ह.भ.प.वै.कृष्णाजी माऊली यांच्या समाधी स्थळापासून कावड यात्रेचे तोरणमाळकडे प्रस्थान होते. पुढे पिसोळबारी मार्गे साक्री कळंबीर तसेच सारंगखेडा येथील प्रभू एकमुखी दत्ताचे दर्शन करून, प्रकाशा येथून तापी-पुलिंंदा-गोमाई या त्रिवेणी नंदीच्या संगमावरून पवित्र जल घेऊन श्रीक्षेत्र तोरणमाळ येथे दरकोस दरमुक्काम करत पायी कावड यात्रा मार्गस्थ होते असते. तोरणमाळला पोहचल्यावर येथील तलावाला प्रदक्षिणा घालून गोरक्षनाथ मंदिरावर कावडयात्रेचे आगमन होते. गुरू गोरक्षनाथ मंदिराचे महंत योगी संजूनाथ महाराज यांनी कावड यात्रेचे स्वागत करत पूजाअर्चा करून कावड यात्रेकरूंनी आणलेल्या जलाने विधीवत अभिषेक करण्यात येतो. दुसऱ्या दिवशी महाप्रसादाचे वाटप करण्यात येते.

             या कावडयात्रेत मुख्यप्रवर्तक गोरक्षक उमेशभाऊ गुरव, निंबा बाबा, उत्तम बाबा, बापू बच्छाव, तुषार पगारे, सुभाष गुरव, कमलेश राजू, प्रशांत बच्छाव, बाळा बच्छाव, हिरामण रामदास बागुल, संजय मुजवाडकर, सागर पाटणकर, अनिल शेवाळे, समाधान अहिरे, नाराप्पा भानुदास माळी, संजय गायकवाड, गौरव खैरनार, वैभव बच्छाव, शरद मिस्तरी, दादू दिनकर, संभाजी बागुल, बापू लोणारकर, समाधान अहिरे, मधु मिस्त्री, मोहन अहिरे, सचिन जावई, बापू माऊली, सनी सोळंकी, संजय लोंढे, राहुल कोळी, नवतेज खैरनार, विष्णू सोनवणे, रोशन मोहिते, वैभव शेवाळे, वैभव कुंभार, शिवाजी बच्छाव, रवींद्र खैरनार, भिका खैरनार, कैलास शेवाळे, अनिल कातडी, भगवान गुरव, दीपक जगताप, प्रसाद जगताप, विठ्ठल शेवाळे, अमोल जगताप, वीरेंद्र, दुर्गेश, सनी आदीसह शेकडो भाविक सहभागी झाले होते.

Post a Comment

0 Comments

|