Header Ads Widget


आदिवासी दिवस जल्लोषात साजरा...

 

 


      नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी/प्रा. गणेश सोनवणे:शहादा  माध्यमिक विद्यालय आमोदा येथे जागतिक आदिवासी दिवस साजरा करण्यात आला.. कार्यक्रमाची सुरुवात धरती पूजन करून सांस्कृतिक रॅलीला सुरुवात करण्यात आली. रॅली आमोदा गावातून काढण्यात आली. त्यात मुलांनी महामानव बिरसा मुंडा, क्रांतिवीर खाज्यां नाईक, महामानव क्रांतिवीर एकलव्य, राणी दुर्गावती आणि जयपालसिंग मुंडा यांच्या वेशभूषा करून जींवत देखावा सादर केला. आदिवासी नृत्याच्या चालीवर मुली मुलांनी समूह नृत्य सादर केले. त्या नंतर शाळेत वकृत्व स्पर्धा आयोजित केल्या होत्या. त्यावेळी कार्यक्रमात महामानव बिरसा मुंडा, खाज्या नाईक, राणी दुर्गावती, विर एकलव्य, जयपालसिंग मुंडा यांचा जयघोष करत घोड्यावरून प्रवेश करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मुख्याध्यापक जे.बी. पवार होते. या कार्यक्रमाची सुरुवात धरती माता वंदन गीताने केली. कार्यक्रमांचे प्रमूख पाहूणे म्हणून आमोदा गणाचे पंचायत समिती सदस्य सत्येन वळवी, ज्येष्ठ नागरिक तुकाराम नाईक, माजी उपसरपंच सुरजित शेमले, युवा कार्यकर्ते सागर नाईक, चंद्रसिंग दादा, दिलवर पाडवी तसेच आमोदा , फत्तेपूर, मडकाणी गावातील पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून प्रा. अशोक वळवी यांनी आपल्या मनोगतात आदिवासी संस्कृती परंपरा वाचविणे गरजेचे आहे, पृथ्वीला वाचवायचे असेल तर जल, जंगल वाचविणे आवश्यक आहे. जल जंगल वाचवायचे असेल तर आदिवसीच या धरती मातेला वाचवू शकतो असे प्रतिपादन केले.अध्यक्षीय भाषणात जे.बी. पवार यांनी आदिवासींचे शिक्षण, आरोग्य, बेरोजगारी या प्रमूख समस्यांवर प्रकाश टाकला. या समस्यांचे उत्तर शोधणे फार गरजेचे आहे. तरच आदिवासींचा विकास होईल.या कार्यक्रमात 20 विद्यार्थ्यांनी भाषण सादर केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले तर कार्यक्रमांचे सूत्रसंचलन पी. डी. पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन एस के पाटील यांनी मानले.

Post a Comment

0 Comments

|