Header Ads Widget


शहाद्यात समता , तेरापंथी , महावीर भवनात त्रिवेणी चातुर्मास ठिकाणी जाणाऱ्या रस्त्यावर खड्डात पाणी साचल्याने मुरूम टाकण्यासाठी प्रशासनचे दुर्लक्ष..

 


नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी/प्रा.गणेश सोनवणे:शहाद्यात येत्या दि २० जुलै  पासून प्रत्येकी समता,तेरापंथी व महावीर भवण येथील जैन स्थानकात दररोज सकाळी ९ते १० प्रवचन राहणार आहे.तसेच  जैन समुदायातील संत - सतिया 4 महिन्या साठी एकाच ठिकाणी स्थिरवास आहे. ज्याठिकाणी प्रवचन होत आहे त्या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डेचखड्डे झाल्याने पाऊसाचे पाणी थांबल्याने जैन संत, प्रवचन श्रोत्यांना गढुळ पाण्याने जावे लागते आहे. पालिका प्रशासनाकडे खड्डे मुरुन टाकण्याची मागणी केली आठवडा लोटुन दखल घेतली नसल्याने प्रशासणाकडुन बाबत नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. 

   शहादा येथील समता भवनात आचार्य भगवंत 1008 श्री रामलालजी म.सा. चे अज्ञानुवर्ती शिष्य शासन दीपक प.पूज्य पदममुनीजी म. सा. आदी ठाणा 3 यांचे स्थिरवास आहे.तर आचार्य तुलसी मार्ग येथील तेरापंथी भवनात प.पुज्य आचार्य श्री महाश्रमणजी यांचे सुशिष्या साध्वी श्री प्रज्ञाश्रीजी आदी ठाणा 4 यांचे तर अहिंसा चौक वरील महावीर भवनात प. पूज्य गुरुदेव कानमुनिजी महाराज साहेब , पूज्य गुरुदेव गुलाबमुनिजी महाराज साहेब यांचे सुशिष्या प. पू. सुवर्णाजी म.सा. आदी ठाणा 4 यांचे शहादा शहरात भव्य आगमन झाले आहेत.सालावादाप्रमाणे जैन समुदायातील   संत - सतीया आप आपल्या क्षेत्रातील पावसाळ्यात चातुर्मासा निमित्त आपल्या क्षेत्रातील जैन भवनात थांबून लोकांना ज्ञान देण्याचे कार्य , धार्मिक शिबिर , धार्मिक पाठांतर,  धार्मिक संस्कार घडविण्याचे कार्य या चार महिन्यात देण्यात येते.तसेच या मनुष्य जन्माचे सार्थक कसे होईल याचे ही सविस्तर माहिती समाजाला देण्याचे किंवा समजिविण्याचे प्रयत्न केले जाते. पूर्वजांनी  मोक्ष गती  प्राप्त केली त्यांनी मनुष्य जन्म प्राप्त करून त्यां ठिकाणी अनेक तप - साधना केली .त्यानंतर त्यांना मोक्ष गती प्राप्त झाली. मोक्ष गती प्राप्त करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला मनुष्य गतीत जन्माला यावं लागतं कोणाचे वाईट बरं केलं नाही आणि तपस्या मोठ्या प्रमाणात केली तर निश्चित त्या व्यक्तीला मोक्षाची प्राप्ती होते. शहरातील समता, तेरापंथी व महावीर भवन येथे गत २१ जुलै पासून प्रवचनात सुरवात झाली आहे. प्रवचनात शहरातील जैन समाजातील महीला पुरूष सह इतर समाजाचे लोक प्रवचनासाठी येत आहे. प्रवचन स्थळावर जाण्यासाठी असलेला रस्ता सहा महिणे आगोदर तयार करण्यात आला होता. पाऊसाळ्यास सुरवात होताच रस्ताला चाळण  लागली आहे. गत काही दिवसा पासुन पाऊसाने दमदार हजेरी लावली असल्याने खड्यांनमध्दे पाणी थांबल्याने सुवर्ण, कुत्रे जनावर पाण्यात विष्ठा टाकुन गढुळ करत आहेत. जैन संत सतिया हे गढुळ पाणीतुन, हिरवे गवत यावरुन जात  नसतात. परंतु शहरातील त्रिवेणी ठिकाणी रस्ताची चाळण झालेली असल्याने गढुढ दुर्गंधी येते असलेल्या पाणी ठिकाणास पासुन प्रवचन स्थळी जावे लागते आहे. चातुर्मास सुरु होण्याचा आगोदर पालिका प्रशासनास याभागात खड्ड्यात मुरुम टाकुन पाणीचे डाबके भरण्यासाठी सांगुन देखील आठवडा लोटला गेला मात्र प्रशासन हेतुतः दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप होत आहे. 

 साधुमर्गी जैन संघाचे अध्यक्ष प्रकाशचंद कोटडीया तर मंत्री उत्तमचंद चोरडिया व तेरापंथी जैन संघाचे अध्यक्ष कैलास संचेती तर मंत्री पुषलाल भंडारी तर श्री वर्धमान स्थानक वासी जैन समाजाचे अध्यक्ष - अड.प्रदीप टाटीया तर सेक्रेटरी - निखिल साबद्रा यांनी सर्व भाविकांनी दर्शनाचे लाभ घ्यावे असे आव्हान केले आहे. 

........................................... 

सध्या समता, तेरापंथी व महावीर भवन येथे चातुर्मा सुरू आहे हा चातुर्मास सलग चार महिने राहणार आहे.याभागात रस्ता खड्डे पडले आहेत पावसाळ्यात पाणी साचले आहे. पाण्यात वराह, कुत्रे, जनावरांचे विष्ठा पडल्याने जैन संत सतिया यांना याच पाण्यातून वाट काढावी लागते. खड्यात मुरुम टाळण्यासाठी न. पा प्रशासन कडे वारंवार सूचना देऊनही या रस्त्यावर कोणी दखल घेतलेली नाही आमचे गुरु महाराज पाण्यात आणि हिरवळ जागेवर पाय ठेवत नाही त्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे जर प्रशासनाने होत नसेल तसे आम्हाला सांगावे आम्ही स्वखर्चाने हे काम करून घेण्यास तयार आहोत. 

... सामाजिक कार्यकर्ते समीर जैन.... 


 

 

Post a Comment

0 Comments

|