Header Ads Widget


मालसिंग वसावेचा सेट परीक्षेतील यशाबद्दल सत्कार...

 


नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी /प्रा. गणेश सोनवणे:पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय येथील अर्थशास्त्र विभागाचा विद्यार्थी मालसिंग हन्या वसावे याचा सेट परीक्षेतील यशाबद्दल अर्थशास्त्र विभागाच्या वतीने सत्कार करण्यात आला. दि.7एप्रिल2024 रोजी त्याने सेटची परीक्षा दिली होती. त्या परीक्षेचा निकाल दि.5 ऑगस्ट 2024 रोजी लागला असून त्यात तो उत्तीर्ण झाला आहे. याबद्दल पूज्य साने गुरूजी विद्या प्रसारक मंडळाचे समन्वयक प्रा .मकरंद पाटील,प्राचार्य डॉ.एम.के.पटेल, अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. ए. आर. निकम, प्रा. एस. एस. पवार,प्रा. एस.एल.भालेराव यांनी पुढील वाटचालीसाठी त्याला शुभेच्छा दिल्या. त्याच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष बापूसाहेब दीपकभाई पाटील, उपाध्यक्ष जगदीशभाई पाटील, सचिव श्रीमती कमलताई पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मयूरभाई दीपक पाटील यांनी कौतुक करत भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Post a Comment

0 Comments

|