Header Ads Widget


सानेगुरुजी महाविद्यालयात रासेयोतर्फे एक पेड माँ के नाम अभियान आरंभ...

 


 


नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी/प्रा. गणेश सोनवणे:पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय शहादा येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे एक पेड माँ के नाम उपक्रमांतर्गत वृक्षारोपण करण्यात आले. 

     वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ.एम.के.पटेल यांनी वृक्षारोपण करून उपक्रमाचे उद्घाटन केले.त्यांनी यावेळी मार्गदर्शन करतांना,हा उपक्रम पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबद्दल जागरूकता निर्माण करणे महत्वाचे आहे असे मत मांडले.या उपक्रमांतर्गत महाविद्यालय परिसरात कडूलिंब, सीताफळ, जांभूळ, आंबा, बांबू अश्या विविध प्रकारची शंभरहून अधिक झाडे लावण्याचा मानस महाविद्यालयाचे रासेयो विभागाचा आहे.सदर कार्यक्रमा साठी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ.एम.के.पटेल,उपप्राचार्य डॉ.एस.डी.सिंदखेडकर,प्रा.एस.के.तायडे,डॉ.एस.एस.पाठक, डॉ.ए.जी.बेलदार,डॉ.राजेंद्र पाटील, प्राध्यापक,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.या उपक्रमाचे पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष बापूसाहेब दीपकभाई पाटील, उपाध्यक्ष जगदीश पाटील, सचिव श्रीमती कमलताई पाटील, समन्वयक प्रा.मकरंद पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मयूरभाई दीपक पाटील, प्राचार्य डॉ. एम. के. पटेल, उपप्राचार्य डॉ. एस.डी. सिंदखेडकर यांनी कौतुक केले आहे.रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ.वजीह अशहर, डॉ.सतीश भांडे, प्रा.विजया पाटील व रासेयो स्वयंसेवकांनी उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.

Post a Comment

0 Comments

|