Header Ads Widget


साक्रीत सि.गो.पाटील महाविद्यालयात शिक्षक पालक मेळावा संपन्न ...

 



साक्री प्रतिनिधी/अकिल शहा:
कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाचे असून पालकांनी देखील सक्रियपणे यात सहभाग घेतल्यास समग्र शिक्षणाची शिदोरी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल असे मत प्राचार्य डॉ.राजेंद्र अहिरे यांनी व्यक्त केले. विद्या विकास मंडळाचे सिताराम गोविंद पाटील कला विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय साक्री येथे शैक्षणिक वर्ष 2024-25 च्या शिक्षक- पालक मेळावा प्रसंगी ते बोलत होते. सदर मेळाव्यास प्रमुख अतिथी म्हणून महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.अनंत पाटील,अकरावी व बारावी वर्गाच्या प्रवेशित विद्यार्थ्यांचे पालक, कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा.संजय सूर्यवंशी उपस्थित होते.सदर मेळाव्यात शिक्षक पालक समिती स्थापन करण्यात आली. त्यात अध्यक्ष महेश नांद्रे, उपाध्यक्ष प्रज्ञा पाटील, सचिव प्राचार्य डॉ.आर.आर.अहिरे, पालक सदस्य म्हणून संजय कदम,सचिन पाटील,मालती सोनवणे,प्रतीक्षा गोसावी, वैशाली देशमुख यांची तर शिक्षक सदस्य म्हणून प्रा.संजय सूर्यवंशी यांची निवड करण्यात आली. सदर मेळाव्याचे सूत्रसंचालन प्रा.चेतन पदमर यांनी तर आभार प्रदर्शन प्रा.पूजा पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.कमलेश सूर्यवंशी,प्रा.राजश्री देवरे,प्रा.सुश्रुषा बोरसे,प्रा. योगिता पवार, वरिष्ठ लिपिक राजेंद्र बोरसे,श्री उमेश वसईकर,श्री प्रशांत बोरसे यांनी परिश्रम घेतले. सदर मेळाव्यास विद्यार्थी व पालक बहुसंख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

|