Header Ads Widget


पिक-अप विक्रेता एजंट संदीप शिंदे विरुद्ध वणी पोलिस ठाण्यात आदिवासी युवकाची फसवणुकीची तक्रार.

 




दिंडोरी /प्रतिनिधी:पीक-अप खरेदी विक्री करणारा वणी येथील दलाल ( एजंट ) मानसी अपार्मेंट मध्ये राहणारा संदीप शिंदे याच्यावर एका आदिवासी युवकाच्या पीक अप गाडीची परस्पर विक्री करत नव्वद हजार रुपयांच्या फसवणुकीची तक्रार वणी पोलिस ठाण्यात लेखी स्वरुपात देण्यात आली आहे.संदीप शिंदे याने संगमनेर येथील रहिवासी असलेला आदिवासी युवक अमोल खांडवी याला मी पीक अप खरेदी विक्री करतो तुला तुझी गाडी विकून देण्यास सहकार्य करतो असे सांगत मला या व्यवहारात कमिशन द्यावे लागेल असे सांगून अमोल खांडवी याची पीक अप क्रमांक एम एच 41 जि 1363 हीची परस्पर विक्री केल्याचे समजल्यानंतर त्याने संदीप शिंदे याच्याशी वणी येथे त्याने दाखविलेल्या राईस मिल येथील कार्यालयात जाऊन वेळोवेळी भेट घेत राहिलेल्या रकमे बाबत विचारणा केली मात्र संदीप शिंदे याने नेहमी उडवा उडवी ची उत्तरे दिली.व त्याने त्याचा मोबाईल नंबर ही बंद करून ठेवला.संदीप शिंदे याने आपली फसवणूक केल्याची खात्री झाल्यानंर अमोल खांडवी याने वणी पोलिस ठाण्यात फसवणूक केल्याची तक्रार दाखल केली आहे.संदीप शिंदे याने नाशिक जिल्ह्यात विविध फायनान्स कंपन्या यांची खोटी कागत पत्रे देऊन फसवणूक केल्याचे अनेक प्रकार उघड झाले असून त्याच्यावर चांदवड न्यायालयाने समन्स जारी केले आहे.वणी पोलिसांनी जनतेला व विविध फायनान्स कंपन्यांना अशा प्रकारची फसवणूक झाली असल्यास वणी पोलिसांशी संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.सदरील प्रकरणाचा अधिक तपास वणी पोलिस करत असून.त्याला मार्गदर्शन व सहकार्य करणाऱ्यांवरही कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी आदिवासी समाज बांधवांकडून करण्यात येत आहे.

गाडी खरेदी विक्रीच्या आर्थिक व्यवहारात फसवणूक झालेल्या नागरिकांनी वणी पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे सपोनि सुनील पाटील यांचे आवाहन..



Post a Comment

0 Comments

|