Header Ads Widget


कासारेत शाळकरी विद्यार्थ्यांना दामिनी पथकाने केले मार्गदर्शन...

 

साक्री प्रतिनिधी/अकिल शहा

शाळा,कॉलेज,महाविद्यालय,बसस्टँड परिसरात टवाळखोरांच्या वतीने विद्यार्थीनींची होणारी छेडछाड रोखण्यासाठी ,रॅगिंग किंवा अंमली पदार्थाच्या आहारी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना रोखण्यासाठी, रस्त्यावर रोड रोमियोंना धडा शिकविण्यासाठी धुळे जिल्ह्यात साक्री पोलीस ठाण्यात दामिनी पथकाची नेमणूक करण्यात आली आहे. या दामिनी पथकातील पोलीस दिदी शाळा ,महाविद्यालये सुरू झाल्यापासून विद्यार्थ्यांशी संवाद साधत आहे. जिल्हा पोलीस दलाच्या वतीने कम्युनिटी पोलिसींग योजनेतर्गत विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबवले जातात. धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.श्रीकांत धिवरे व पोलीस उपविभागीय अधिकारी श्री.संजय भांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे जिल्ह्यात दामिनी पथक उपक्रम राबवला जात आहे. या उपक्रमाअंतर्गत साक्री पोलीस ठाण्यातील दामिनी पथकातील असई मंजुळा कोकणी व पो.हे.कॉ ईलाताई गावित यांनी दि. ७ ऑगस्ट २०२४ गुरूवारी रोजी कासारे गावातील शाळा, कॉलेज ,महाविद्यालय बस स्टँड परिसरात पेट्रोलिंग केले. कासारे गावातील वसंतदादा पाटिल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय व खानदेश गांधी बाळूभाई मेहता माध्यमिक विद्यालयांना भेट दिली.विद्यालयात विद्यार्थिनींवर होणारे अत्याचार छेडखानी व विद्यार्थिनींनी स्वसंरक्षण कसे करावे, सायबर गुन्हे, अमली पदार्थांचे दुष्पपरिणाम, पोस्को कायदा माहिती, ऑनलाईन फसवणूक, महिलांची सुरक्षा,वाहतूक व्यवस्थापन या विषयी दामिनी पथकातील पोहेकॉ ईलाताई गावित यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधतांना मार्गदर्शन केले व तसेच कॉलेजला येत असताना एखादा अनोळखी व्यक्ती चॉकलेट वगैरे खाण्यास देत असेल तर ते स्वीकारू नका, मोबाईलचा अतिरेक वापर टाळा, रात्री अपरात्री एकटे फिरू नका,असे आवाहन या वेळेस पोलिसांच्या वतीने ईलाताई गावित यांनी केले. या वेळी त्यांनी नगर जिल्हयात एका शाळकरी विद्यार्थिनीचे हात -पाय -तोंड बांधून किडनॅपिंग करण्याचा प्रयत्न करीत असतांना तिच्या तत्परतेने व जागृत स्थानिक नागरिकांच्या मदतीने तिने अपहरण होण्यापासून कसे वाचविले याचे उदाहरण दिले अशा प्रकारची घटना आपल्या परिसरात घडत असल्यास आपणही पोलीसांना तात्काळ माहिती द्या असे आवाहन या वेळी पोहेकॉ गावित यांनी केले.

Post a Comment

0 Comments

|