Header Ads Widget


शहादा येथील युवा शिवभक्तांनी कावड पदयात्रा करीत श्री केदारेश्वर महादेव आणि श्री नर्मदेश्वर महादेव यांचे केले जलाभिषेक....

 




नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी /प्रा. गणेश सोनवणे: शहादा येथील डोंगरगाव रोड वरील हरिओम नगर स्थित श्री नर्मदेश्वर महादेव मंदिर परिसरातील युवा शिवभक्त आणि भगिनींनी श्री नर्मदेश्वर महादेव मंदिर ते दक्षिण काही असलेल्या प्रकाशा येथील केदारेश्वर महादेव मंदिर आणि परत श्री नर्मदेश्वर महादेव मंदिरापर्यंतची कावड पदयात्रा पूर्ण केली. श्री नर्मदेश्वर महादेव प्रांगणातील जलाने श्री केदारेश्वर महादेवाला जलाभिषेक तर प्रकाशा येथील तापी नदीच्या पवित्र जलाने श्री नर्मदेश्वर महादेवाला जलाभिषेक करण्यात आले.हरिओम नगर, शहादा येथे ऑगस्ट 2022ला श्री नर्मदेश्वर महादेवाची प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम श्रावण महिन्यात करण्यात आला होता. मागील वर्षी येथील युवा शिवभक्तांनी श्री नर्मदेश्वर महादेव मंदिर प्रांगणातील जल भरलेली कावड घेऊन पायी प्रकाशा येथील केदारेश्वर महादेवाच्या दर्शनासाठी व जलाभिषेक करण्यासाठी गेले होते. दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या प्रकाशा येथून तापी नदीचे पवित्र जल कावडमध्ये घेऊन हे युवा भाविक नर्मदेश्वर महादेवासाठी पायी आले होते. या वर्षी त्यांना महिला भाविकांचे प्रोत्साहन आणि साथ मिळाली. काल दि. 5 ऑगस्टला श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी श्री नर्मदेश्वर महादेव मंदिर, शहादा ते केदारेश्वर मंदिर, प्रकाशा हे अंतर सुमारे 18 किलोमीटर असून केदारेश्वर महादेवाला जलाभिषेक करून, दर्शन घेऊन भाविक तेथील पवित्र जल भरून शहाद्याला कावड पदयात्रा परत येत तापी नदीच्या पवित्र जलाने श्री नर्मदेश्वर महादेवाचा जलाभिषेक करीत आपली पदयात्रा पूर्ण केली.कावड पदयात्रेमध्ये युवा शिवभक्त ओम रमेश पाटील, रोशन प्रकाश पटेल, रोहित महिंद्र पाटील, रोहित भरतसिंग वाघ, वेदांत माधवराव पाटील, प्रमोद चित्ते, अजय भरत पाटील, मोक्ष प्रफुल्ल पटेल, यश मनिलाल पाटील, चैतन्य प्रल्हाद शिरसाठ, बंटी दिलीप सोनवणे सामील झाले होते. तर त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी स्वाती पाटील, मीनाक्षी निंबाळकर, बिजुबेन पाटील, रेखा पाटील, करुणा पाटील, सुनिता पाटील या महिला शिवभक्त सामील झाल्या होत्या. त्यातील स्वाती पाटील व मीनाक्षी निंबाळकर यांनी पदयात्रा पूर्ण केली तर वयस्क महिला भाविकांनी त्यांना केदारेश्वर मंदिरापासून पाच किलोमिटर पर्यंतची साथ दिली होती.

Post a Comment

0 Comments

|