Header Ads Widget


दी लिजेंडरी गायक किशोर कुमार यांच्या जन्मदिवसानिमित्त भव्य गीतगायन स्पर्धेचे आयोजन...

 


नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी/प्रा. गणेश सोनवणे:गाण्याची प्रचंड आवड आहे परंतु आजपर्यंत व्यासपीठ उपलब्ध नसलेल्या कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करुन दिल्याने कलाकारांनी रविवारची संध्याकाळ शहादेकरांना आपल्या गोड, सुरेल आवाजाने मंत्र मुग्ध केले. गाण्यातून त्यांनी आपणही उत्तम कलाकार आहोत हे दाखवून दिले.येथील डोंगरगांव रस्त्यावरील अन्नपूर्णा लॉन येथे (ता.४) रविवारी सायंकाळी पाच वाजता  दी लिजेंडरी गायक किशोर कुमार यांच्या जन्मदिवसानिमित्तभव्य गीतगायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात १३० कलाकारांनी ऑडिशन दिली होती पैकी३० कलाकार स्पर्धेस पात्र ठरले होते.यावेळी महिलांनी देखील मोठ्या प्रमाणात स्पर्धेत भाग घेतला होता.४५ वर्षावरील सहभागी स्पर्धकांनी आपणही चिरतरुण आहोत हे दाखवून दिले. या सुरेल मैफिलीत मंजिले अपनी अपनी जगह है, दिल ऐसा किसीने तोडा, ये दिल उनकी निघाहो...., मेरे नैना सावन भादो..., मेरा जीवन कोरा कागज.... असे एकाहून एक सरस गीत गात उपस्थित शेकडो श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. यावेळी माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी, आयोजक शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अभिजित पाटील, डॉ. प्रदीप कुमार पटेल,माजी नगरसेवक रविंद्र जमादार, माधव पाटील यांसह शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अरुण चौधरी, सातपुडा शिक्षण संस्थेचे सचिव प्रा. संजय जाधव,जेष्ठ पत्रकार रमाकांत पाटील, विकास इंग्लिश मिडीयम स्कूल चा संचालिका प्रिती पाटील,किशोर पाटील, माजी उपनगराध्यक्ष जहीर शेख, ऍड. जसराज संचेती,गुरुचरण राजपाल आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी स्पर्धेतील प्रथम तीन विजेत्या स्पर्धकांना प्रशस्तीपत्र, भेटवस्तू व सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले व उर्वरित स्पर्धकांना सहभागाबद्दल प्रशस्तीपत्र देण्यात आले. यावेळी स्पर्धेत प्रथम क्रमांक जितेंद्र वेडूसिंग गिरासे, द्वितीय क्रमांक हेमंत वसंत देशपांडे, तृतीय क्रमांक संतोष कालिदास मिरघे यांनी पटकावला. स्पर्धेचे परीक्षण भरत पाटील, डॉ.संतोष परदेशी, शितल जैन,मृणालिनी ढोले, रविंद्र मराठे या तज्ज्ञांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विष्णू जोंधळे यांनी केले.


" राजकारण नेहमी होत असते,आपसातील मतभेद विसरून नागरिकांना एकत्रित येण्यासाठी गाणे हे प्रभावी माध्यम आहे.ज्यांना आजपर्यंत व्यासपीठ उपलब्ध झाले नाही त्यांना व्यासपीठ उपलब्ध करुन दिले.यानिमित्ताने शहादयाचा नावलौकिक वाढेल.ज्यांना गाण्याची आवड आहे अशा कलाकारांसाठी प्रत्येक रविवारी सायंकाळी पाच ते सात या वेळेत सरावासाठी विकास हायस्कूल मध्ये व्यासपीठ उपलब्ध करुन देण्यात आले आहे.त्याचा लाभ घ्यावा.-----अभिजित पाटील (आयोजक, गितगायन स्पर्धा)

Post a Comment

0 Comments

|