Header Ads Widget


के.व्ही.पटेल कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची शासकीय सेवेत निवड.



   नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी/प्रा. गणेश सोनवणे:शहादा येथील पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या के.व्ही.पटेल कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची कृषी विस्तार अधिकारी, कृषी सहायक व तलाठी पदी निवड झाली असून महाविद्यालयात त्यांचा सत्कार करण्यात आला आहे.

     पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे के.व्ही.पटेल कृषी महाविद्यालय शहादा येथील विद्यार्थी संजोग जीवन भारती यांची नुकत्याच झालेल्या सरळ सेवा पदभरती अंतर्गत जिल्हा परिषद कृषी विस्तार अधिकारी म्हणून निवड झाली. त्याबरोबरच मंदार पाटील, मकरंद खैरनार चंद्रशेखर देसले, दर्शन पटेल, योगेश कळमकर या विद्यार्थ्यांची कृषी सहाय्यक तसेच विद्यार्थिनी गुंजन कुरकुरे यांची तलाठीपदी निवड झाली आहे. विद्यार्थ्यांनी प्राप्त केलेल्या यशाचे सर्व स्तरावरून कौतुक करण्यात येत आहे. मंडळाचे अध्यक्ष बापूसाहेब दीपकभाई पाटील, उपाध्यक्ष जगदीश पाटील, सचिव श्रीमती कमलताई पाटील,समन्वयक प्रा.मकरंद पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मयूरभाई दीपक पाटील यांनी अभिनंदन केले आहे.मंडळाचे समन्वयक प्रा.मकरंद पाटील व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी.एल.पटेल यांनी यशस्वी विद्यार्थ्याचा महाविद्यालयात झालेल्या कार्यक्रमात सत्कार व अभिनंदन केले.यावेळी मनोगत व्यक्त करतांना संजोग भारती यांनी कृषी महाविद्यालयात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना कृषी शिक्षणाचे महत्त्व, स्पर्धा परीक्षा, बँकिंग आणि व्यक्तिमत्व विकास यासंबंधीचे अनमोल मार्गदर्शन केले तसेच महाविद्यालयाच्या शिक्षक वृंदाचे ऋणनिर्देश व्यक्त केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.विजय गवांदे यांनी केले.

Post a Comment

0 Comments

|