Header Ads Widget


मैत्री दिनानिमित्त जायन्टस तर्फे वृक्षारोपण...

 


नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी/प्रा. गणेश सोनवणे:शहादा तालुक्यातील सावळदा येथे जायन्टस गृप व जायन्टस सहेली ग्रुप शहादा तर्फे मैत्री दिनाच्या औचित्य साधत सावळदा फाट्यापासून तर सावळदा गावापर्यंत वृक्षारोपण करण्यात आले.यावेळी जायन्टस चे अध्यक्ष डॉ विवेक नागिन पाटील, सहेली अध्यक्षा स्वाती विवेक पाटील, डॉ लकेशकुमार पाटील, माधव पाटील, माणक चौधरी, कैलास भावसार भूषण बाविस्कर, डॉ सुधीर पाटील, संजय छाजेड, के के सोनार,अर्चना सोनार ,दिपाली बाविस्कर महेश ठाकूर भरत पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते.या वेळी डॉ विवेक पाटील म्हणाले की या पुर्वी गावात लावलेले वृक्ष फार मोठी झाली त्या मुळे गावात आल्यावर सर्वत्र हिरवळ वाटते त्या प्रमाणेच फाट्या पासुन गावापर्यंत लावलेले वृक्ष मोठी झाल्यावर गावाचा निश्चित सौंदर्यात भर पडेल म्हणुन ती वाढविण्यासाठी गावकऱ्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे.



Post a Comment

0 Comments

|