Header Ads Widget


नंदुरबार येथे शासकीय विश्रामगृहात विविध समविचारी सामाजिक संघटनांचे"संवाद बैठक" संपन्न ...

 

नंदुरबार/ प्रतिनिधी:दि२/८/२०२४ रोजी नंदुरबार येथील शासकीय विश्रामगृह येथे नंदुरबार जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील संस्था,संघटनांच्या मान्यवर प्रमुख कार्यकर्त्यांशी प्रवक्ते श्री. विकास लवांडे व जयदेव गायकवाड यांनी संवाद बैठक घेतली यावेळी त्यांचे स्वागत व सत्कार श्री.बाळासाहेब मोरे यांनी केला यावेळी मार्गदर्शन करतांना श्री विकास लवांडे यांनी सांगितले की नंदुरबार जिल्हा आदिवासी लोकसंख्या असलेला व राजकीय दृष्ट्या विधानसभा लोकसभा मतदारसंघ राखीव आहेत.



आपल्या जातीचे लोकप्रतिनिधी आपल्या जातीचे भले करतील ही भाबडी अपेक्षा व भावनिक स्वरूपाचा सिद्धांत इथेच नव्हे तर सर्वत्र खोटा ठरतो आहे.शिक्षण,आरोग्य आणि रोजगाराची गंभीर समस्या इथे आहे. येथील जिल्हा प्रशासन व सर्व लोकप्रतिनिधी अपयशी व बेजबाबदार असल्याचे स्पष्ट आहे.भ्रष्टाचाराचे कुरण म्हणजे आदिवासींच्या विविध योजना व विविध शासन निधी आहे.
आम्हाला कुणीही वनवासी म्हणू नये तो गुन्हा ठरावा तसेच आम्ही निसर्गपुजक आहोत आमची संस्कृती मोडीत काढण्याचा कुणी प्रयत्न करू नये ही आदिवासींची मागणी आहे.वन जमिनीवरील मालकी हक्क आदिवासींना मिळावेत ही जुनी मागणी अद्याप पूर्ण होत नाही केंद्र सरकार याबाबत जबाबदार असल्याचे चर्चेत कळले.अल्पसंख्यांक समाजाचे प्रश्न,शेतकऱ्यांचे प्रश्न दुर्लक्षित आहेत रोजगाराअभावी स्थलांतर हा मुख्य प्रश्न बनला आहे.एकंदरीत संतापजनक चित्र आहे.

यावेळी डोंगऱ्या देव संघर्ष समिती संस्थापक अध्यक्ष श्री.वासुदेव गांगुर्डे,सत्यशोधक शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष आर.टी गावित,मौखिक साहित्यिक भीमसिंग वळवी,आदिवासी महासंघ श्री.बी.ई वसावे, भारत जोडो अभियान सलोखा समिती अध्यक्ष श्री.चुनिलाल ब्राह्मणे,एकलव्य आदिवासी संघटना श्री.गणेश सोनवणे सामाजिक कार्यकर्त्या मालतीताई वळवी यांनी मनोगत व्यक्त केले याप्रंसगी एकता परिषद जिल्हाध्यक्ष पंकज वळवी,अल्पसंख्याक सामाजिक संघटना जिल्हाध्यक्ष एजाज बागवान,सामाजिक कार्यकर्त्या डॉ.समिधा नटावदकर, अॅड दानिश पठान,श्री एन.डी पाटील सर श्री.संदीप परदेशी,केशरसिंग क्षेत्रीय,काॅग्रेस रोजगार संघटना जिल्हाध्यक्ष रऊफ शेख,श्री खंडेराव पवार,श्री.राजु गावित,तालुका उपाध्यक्ष श्री सुनील पवार,श्री.रमेश पाटील,सामाजिक कार्यकर्ते श्री उमाकांत पाटील,सुबोध अहिरे, सुर्यकांत नेरकर,हेमंत वळवी,प्रतीक पाटील,प्रणय पाटील,सागर पाटील,समाजातील जिल्ह्यातील क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्ते सेवा आंबेकर कार्यकर्ते साहित्यिक उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.राजेंद्र पाटील यांनी केले आभार श्री.उमाकांत पाटील यांनी मानलें.

Post a Comment

0 Comments

|