Header Ads Widget


माध्यमिक विद्यालय दुधाळे येथे लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त येथे वत्कृत्व स्पर्धा संपन्न.

माध्यमिक विद्यालय दुधाळे येथे लोकमान्य टिळक  पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त येथे  वत्कृत्व स्पर्धा संपन्न.

शैक्षणिक सांस्कृतिक व क्रीडा विकास संस्था वाघाळे संचालित  प्राथमिक व माध्यमिक यांच्या संयुक्त विद्यमाने लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्त वत्कृत्व स्पर्धा संपन्न करण्यात आली.


कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून शाळेचे संस्था कार्याध्यक्ष श्री कमलेश दादा अहिरे व माध्यमिक  मुख्याध्यापक ठाकरे सर व प्राथमिक मुख्याध्यापक भामरे सर व प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती जे एस सोनवणी मॅडम , पवार सर उपस्थित होते. अध्यक्ष व प्रमुख पाहुणे तसेच लोकमान्य टिळक यांची वेशभूषा केलेला इ.7 वी तील विद्यार्थी निखील भील यांच्या शुभहस्ते लोकमान्य टिळकांच्या प्रतीमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करत वकृत्व स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.


वकृत्व स्पर्धा इ. 5 वी व 7 वी साठी लहान गट तसेच इ8 वी व 10 वी साठी मोठा गट अशी दोन गटात आयोजित करण्यात आली होती त्यात इयत्ता  10पर्यंतच्या एकूण 60 विद्यार्थ्यांनी सहभाग घेत लोकमान्य टिळकांच्या जीवनावर आधारीत भाषण केली स्पर्धेचे परीक्षण शाळेतील वर्गशिक्षक श्री पवार सर व श्रीमती रोहिणी भदाणे यांनी केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक करत कुठल्याही स्पर्धेत यशस्वी होण्यापेक्षा सहभागी होणे हे किती महत्वाचे असते ते विविध उदाहरणातून समजावून सांगितले तसेच शालेय जीवनात आयोजित केलेल्या वकृत्व स्पर्धा या भविष्यातील वक्ते निर्माण करतात असे म्हणत शालेय जीवनातील वकृत्व स्पर्धेचे महत्व विद्यार्थ्यांना सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीम रोहिणी भदाने व आभार प्रदर्शन श्री निखिल अकलाडे यांनी केले तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी हितेश कुमार वाघ सर व ज्ञानेश्वर कोळी सर शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले .* वत्कृत्व स्पर्धा संपन्न.

Post a Comment

0 Comments

|