Header Ads Widget


साक्रीत सिताराम गोविंद पाटील महाविद्यालयामध्ये सायबर सिक्युरिटी व जनरल अवेअरनेस कार्यशाळेचे आयोजन...


साक्री प्रतिनिधी/अकिल शहा:
साक्री तालुक्यातील एमकेसीएल अधिकृत संगणक प्रशिक्षण केंद्र व विद्या विकास मंडळाचे सिताराम गोविंद पाटील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील विज्ञान मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने "सायबर सिक्युरिटी व जनरल अवेअरनेस" या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर आर. आर. अहिरे तर उपाध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. अनंत पाटील हे उपस्थित होते. संकल्प कम्प्युटरचे संचालक श्री भटू तानाजी पाटील, ऋतिक कॉम्प्युटरचे संचालक श्री. जयेश तांबटकर, स्वामी कम्प्युटर चे संचालक श्री. इंद्रजीत देशमुख व सुशांत कंप्यूटरचे संचालक श्री. इम्रान पिंजारी यांनी पीपीटी द्वारा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना वाढत्या सायबर गुन्ह्यांबद्दलची माहिती देऊन त्याचे गांभीर्य विद्यार्थ्यांच्या लक्षात आणून दिले. तसेच त्यावरील उपाययोजना सुचवुन आपण कशा पद्धतीने जागरूक राहून आपली स्वतःची फसवणूक टाळू शकतो याबद्दल सविस्तर माहिती दिली. त्यानंतर उपस्थित विद्यार्थ्यांची आयटी जीनियस टेस्ट घेऊन विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ.अहिरे म्हणाले सायबर गुन्ह्यांचे प्रमाण अलीकडे खूपच वाढलेले आहे आणि या गुन्ह्यांमुळे आर्थिक फसवणूक व आत्महत्या यासारखे प्रकार समाजात पहायला मिळत आहेत यामुळे विद्यार्थ्यांनी याबाबत जागरूक असणे ही काळाची गरज आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विज्ञान मंडळाचे अध्यक्ष प्रा.डॉ. प्रीतम तोरवणे यांनी केले तर आभार प्रदर्शन विज्ञान मंडळाचे सचिव प्रा. विलास पावरा यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विज्ञान मंडळाचे सदस्य प्रा. दिनेश खैरनार, प्रा. योगेश आहेर, प्रा. राजू देवकर यांनी प्रयत्न केले. सदर कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

|