शहादा विशेष प्रतिनिधी/जुनैद अहमद: १४ जुलै २०२४ रोजी, महाराष्ट्रातील कोल्हापूरच्या गाझीपूर (विशालगढ) येथील रझा मशिदीची तोडफोड करून शेजारी राहणाऱ्या मुस्लिमांच्या घरात घुसून मालमत्तेची नासधूस केली, तसेच लहान मुले, वृद्ध व महिलांना बेदम मारहाण केली महाराष्ट्रातील या लाजिरवाण्या घटनेनंतर AIMIM महाराष्ट्र राज्य अध्यक्ष व माजी खासदार श्री. सय्यद इम्तियाज जलील यांनी आदेश जारी केला की, महाराष्ट्रभर मजलिसच्या कार्यकर्त्यांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध नोंदवावा, ज्यावर नंदुरबार जिल्हाध्यक्ष सय्यद फरहत हुसेन यांच्या मार्गदर्शनाखाली शहादा एमआयएम संघाच्या वतीने एसडीएम सरांना निवेदन देताना जिल्हाभर आंदोलन करून मागण्यांचे निवेदन देण्यात आले यावेडी जेष्ठ नेते जावेद मुन्शी, शहादा तालुकाध्यक्ष साजिद पिंजारी, शहराध्यक्ष सद्दाम मन्सूरी, कोअर कमिटी सदस्य अन्सारी अमानत, तालुका युवक अध्यक्ष अल्तमश पिंजारी, शहर युवक अध्यक्ष मोहसीन खान (बाला), शेख जुबेर सर, अवेस शेख, उमर बागवान, मोईन पटेल. व मजलीस कार्यकर्ते व शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments