Header Ads Widget


राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोगाचे अध्यक्ष अंतरसिंह आर्य यांना ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईस तर्फे विविध मागण्या संदर्भात निवेदन ...

 


नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी /प्रा.गणेश सोनवणे: जिल्ह्यातील आदिवासी स्वातंत्र्य सेनानी क्रांतिवीरांचे जिल्ह्यातील प्रत्येक तहसील कार्यालयात स्मारक बनवावे तसेच हायवे रस्ता, उड्डाणपूल, चौक, उद्याने आणि वाचनालयांना स्वातंत्र्यसेनानी क्रांतीवीरांचे नावे देण्यात यावीत अशी मागणी राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोगाचे अध्यक्ष अंतरसिंह आर्य यांच्याकडे ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष सुनील सुळे यांनी निवेदनाद्वारे केली आहे. राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोगाचे अध्यक्ष अंतरसिंह आर्य नुकतेच जिल्हा दौऱ्यावर आले होते त्यावेळी ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईस तर्फे त्यांना निवेदन देण्यात आले. त्यात मागणी करण्यात आली निवेदनात म्हटले आहे की, नंदुरबार आदिवासी बहुल जिल्हा असून जिल्ह्यातील आदिवासी स्वातंत्र्य सैनिकांनी व क्रांतिवीरांनी इंग्रजांविरुद्ध लढा दिलेला आहे. ब्रिटिशांनी केलेले शोषण, हुकूमशाही आणि सांस्कृतिक कार्याला विरोध केला होता. ब्रिटिशांच्या हुकूमशाहीला न जुमानता भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका आदिवासी सैनिकांनी निभवली आहे त्यांचे बलिदान व योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे भारताच्या स्वातंत्र्याच्या इतिहासात एक स्वतंत्र इतिहास आदिवासी सैनिकांचा आहे यासाठी जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिकांचे बलिदान आठवणीत राहावे यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक तहसील कार्यालयात व विविध ठिकाणी स्वातंत्र्य सेनानी तसेच क्रांतिवीरांचे नामकरण व्हावे अशी मागणी निवेदनात केली आहे निवेदनावर आॅल इंडिया आदिवासी एम्पलाईज फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष सुनिल सुळे, जिल्हा उपाध्यक्ष करणसिंग तडवी ,प्रा.अशोक वळवी , मनोहर पावरा ,डाॅ.भगवान खेडकर , इंजि.महेद्र नाईक , सचिन पावरा ,रामदास पावरा ,कमल पावरा आदींच्या सह्या आहेत.



Post a Comment

0 Comments

|