Header Ads Widget


आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल मंदिरात भव्य धार्मिक पूजा विधीच्या कार्यक्रम आयोजित..


 नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी/प्रा. गणेश सोनवणे:शहादा येथील दोनशे वर्षापेक्षा अधिक पुरातन धार्मिक इतिहास असलेल्या विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशी निमित्त भव्य धार्मिक पूजा विधीच्या कार्यक्रम आयोजित करून शाखा चेअरमन ॲड.राजेश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली लाडकोरबाई विद्यालयाच्या विद्यार्थी व शिक्षीकांनी विठ्ठल-रुक्माई यांच्या पालखीची परिसरात दिंडी काढून सहभाग नोंदवला.

           दरवर्षी आषाढी एकादशीला भाेई गल्ली जवळ असलेल्या विठ्ठल मंदिरात धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जात असते.महाप्रसाद वाटप केला जातो.विशेष म्हणजे उशिरा रात्रीपर्यंत दर्शनासाठी भाविकांची गर्दी सुरूच होती.अखिल भारतीय मराठा महासंघाचे श्याम जाधव व कैलास गोयल यांच्या हस्ते पालखीची पूजा करण्यात आली.

        दिंडीत श्याम जाधव सुरेश जवेरी सप्तशृंगी माता मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र अग्रवाल ॲड.प्रसन्ना सावळे विठ्ठल मंदिर ट्रस्टचे सदस्य व शेकडो भाविक सहभागी झाले होते.पालखीची दिंडी तूप बजार सरदार पटेल चौक सोनार गल्ली लालदास चौक मार्गे विठ्ठल मंदिराजवळ समारोप करण्यात आला.

Post a Comment

0 Comments

|