Header Ads Widget


जल जीवन मिशन योजनेच्या पाण्याच्या टाकीला तयार होण्याआधीच तडे , ठेकेदाराचा निकृष्ट दर्जाचा कामांवर कार्यवाही करा...


नवापूर विशेष प्रतिनीधी/ जुनैद अहमद
:
नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील बोरझर दरीफळी येथील पाण्याच्या टाकीचे काम, नंदुरबार जिल्हा परिषद अंतर्गत असलेल्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या जल जीवन मिशन योजनेतून काम सुरू असून, शासनाच्या हर घर जलसे नल योजनेतून गावातील प्रत्येक घरात पाणी पोहोचवण्यासाठी, केंद्र व राज्यशासन जल जीवन मिशन योजना राबवीत आहे, तर जल जीवन मिशन योजनेअंतर्गत नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील बोरझर दरीफळी येथील, पाण्याच्या टाकीचे बांधकाम संबंधित ग्रामीण पाणीपुरवठा विभाग यांच्याकडून ठेकेदारामार्फत करण्यात येत असून, या पाण्याचे टाकीचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचा होत असल्याचा प्रकार उघड झाला असून, पाण्याच्या टाकीवर चढण्यासाठी व टाकीच्या परिसरातील प्लॅटफॉर्मला मोठा तडा गेला आहे, सीडी वरून टाकीकडे चढत असताना प्लॅटफॉर्मवर उभे राहण्यासाठीचा भाग हा आधांतरीतरित्या झाल्याने या टाकीवर चढण्यासाठी सीडी व टाकीला लागून असलेला प्लॅटफॉर्म हा किती टिकेल? यावरूनच या टाकीचे बांधकाम किती दर्जेदार झाले असेल व ठेकेदाराने कोणत्या पद्धतीने या टाकीचे बांधकामात बांधकाम साहित्य वापरले असेल, हे प्रत्यक्ष संबंधित ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांच्या तपासणीअंती उघड होईल, एकंदरीतच या सर्व प्रकाराकडे नंदुरबार जिल्हा परिषद मुख्य कार्यकारीअधिकारी, व ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांनी लक्ष घालून संबंधित विभागाने दर्जेदार पद्धतीने काम करून देणे गरजेचे आहे, व निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई देखील करणे आवश्यक आहे.

Post a Comment

0 Comments

|