Header Ads Widget


साक्री तालुक्यात तरुणाची गळफास घेत आत्महत्या....

 



साक्री प्रतिनिधी /अकिल शहा:
धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील शेवाळी (दा.) गावात वास्तव्यास असलेला दादा दगडू सोनवणे(३८) वर्षीय युवकाने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.पोलिसांकडून प्राप्त माहितीनूसार दि.२३ जुलै २०२४ रोजी रात्री ०८:३० वाजेच्या सुमारास दादा दगडू सोनवणे रा.शेवाळी (दा.) ता.साक्री जि.धुळे याने राहत्या घरी छताच्या पत्र्याच्या एन्गलला दोरीच्या साहय्याने गळफास घेत आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच त्याचा मोठा भाऊ याने घटनास्थळी धाव घेऊन पाहिले असता दादा सोनवणे याचा गळफास घेतल्याचा मृतदेह आढळून आला, त्याला कुटुंबीयांनी गावातील इतर लोकांच्या मदतीने खाली उतरवून खाजगी वाहनाने ग्रामीण रुग्णालय साक्री येथे रात्री १०/१२ वाजता उपचारासाठी दाखल केले डॉ.रिना शाहू मॅडम यांनी तपासून त्यास मयत घोषीत केले या प्रकरणी कुटुंबीयांनी साक्री पोलीस स्टेशनला दिलेल्या खबरीनुसार साक्री पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.मात्र या घटनेनंतर शेवाळी गाव परिसरात एकच खळबळ उडाली. मयत दादा सोनवणे याच्या पच्छात पत्नी व एक मुलगा व दोन मुली असा परिवार आहे. घरातील कर्ता व्यक्ती गेल्याने सोनवणे कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

Post a Comment

0 Comments

|