Header Ads Widget


वसंतराव नाईक महाविद्यालयात विद्यार्थी प्रेरणा व उद्बोधन कार्यशाळा संपन्न..

 


 


 नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी/प्रा. गणेश सोनवणे:शहादा दिनांक 23 जुलै 2024 रोजी येथील वसंतराव नाईक कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात अंतर्गत गुणवत्ता आश्वासन कक्ष व विद्यार्थी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने प्रथम वर्ष कला शाखेत नव्यानेच प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी प्रेरणा व उद्बोधन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी महाविद्यालयाचे प्राचार्य व या कार्यशाळेचे उद्घाटक प्रो. डॉ. संतोषकुमार पाटील यांच्या हस्ते माता सरस्वती प्रतिमापूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. आपल्या उद्घाटनपर वक्तव्यात त्यांनी सांगितले की, शिक्षक आणि विद्यार्थी हे एक दुसऱ्याला परस्पर पूरक असतात. या महाविद्यालयात विद्यार्थी हितासाठी अनेक उपक्रम राबविले जातात. यासाठी आपल्याला प्रशासनाचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य आपल्याला नेहमी लाभत असते. विद्यार्थी मित्रांनो, आपण नि:संकोचपणे आपल्या शंकांच्या निरसनासाठी संबंधित प्राध्यापकांना भेटू शकतात. हे महाविद्यालय आपल्या सर्वांगीण विकासासाठी बांधील असल्याचे सांगत त्यांनी नवप्रवेशित विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. यानंतर महाविद्यालयाच्या अंतर्गत गुणवत्ता आश्वासन कक्षाचे समन्वयक प्रा. डॉ. बी. वाय. बागुल यांनी आपल्या प्रास्ताविकातून विद्यार्थ्यांना नॅक व विद्यार्थी-पालक यांची भूमिका यासंदर्भात विस्तृत माहिती दिली. यात ते पुढे म्हणाले की, महाविद्यालयात अनेक समित्या कार्यरत आहेत. यांच्या माध्यमातून आपला सर्वांगीण विकास साधुन आपले भविष्य उज्वल घडवायचे आहे. यासाठी प्रत्येक क्षेत्रात तुमच्या सहभाग फार आवश्यक आहे. या सर्वांमधून आपला विकास साधून घेण्याचे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.

          विद्यार्थी हा केंद्रबिंदू म्हणून प्रत्येक समितीचे कार्य व कार्य कक्षा यांची सखोल माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावी म्हणून या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यात विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. जी. एस. पाटील यांनी समन्वयातून विकासाकडे जाण्याचा मार्ग विद्यार्थ्यांना सांगितला. विद्यार्थी उपक्रमातून त्यांची मानसिक भावनिक जडणघडण होत असते. विद्यार्थी अनेक कार्यशाळांमधून व शैक्षणिक-सांस्कृतिक कार्यक्रमातून सहभाग नोंदवून आपल्या विकासासाठी सज्ज असतात. कौशल्याधारित शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळून त्यांचा संपूर्ण विकास साधला जातो. त्यांच्यातील स्वकौशल्य विकसित होण्यासाठी महाविद्यालयाकडून सतत प्रयत्न केले जातात. असे सांगत त्यांनी प्रत्येक समिती ही विद्यार्थी विकास विभागांतर्गत कार्य करत असल्याने विद्यार्थ्यांनी आपला विकास साधून घेण्याचे आवाहन केले. प्राणीशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. आर. डी. पाटील यांनी कमवा व शिका, वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख प्रा. जी. एस. चौधरी यांनी गरीब विद्यार्थी सहायता कक्ष, प्रा. डॉ. मालिनी अढाव यांनी युवती सभा, क्रीडा संचालक प्रा. डॉ. राजेश सोनवणे यांनी क्रीडा विभाग, ग्रंथालय प्रमुख प्रा. डॉ. विजय बर्फे यांनी ग्रंथालय व विद्यार्थी, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. आर. के. पाटील यांनी राष्ट्रीय सेवा योजना एककासंदर्भात तर प्रा. डॉ. बी. वाय. बागुल यांनी विद्यार्थाचा, पालकांचा, माजी विद्यार्थांचा व विद्यार्थी समाधान सर्वेक्षण अभिप्राय भरण्या संदर्भात विद्यार्थ्यांना माहिती दिली. या कार्यशाळेचे सूत्रसंचालन प्रा. एन. एम. साळुंखे तर आभार प्रकटन प्रा. डॉ. डी. वाय. पाटील यांनी केले. प्रा. डॉ. साहेबराव ईशी व प्रा. गणेश पडघन यांनी या कार्यशाळेची तांत्रिक बाजू सांभाळली. प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी यांनी कार्यक्रम यशस्वितेसाठी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments

|