Header Ads Widget


शहादा कृषी महाविद्यालयात प्रगत कौशल्य प्रशिक्षण अंतर्गत कार्यशाळा संपन्न...


नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी/प्रा. गणेश सोनवणे:
पूज्य साने गुरूजी विद्या प्रसारक मंडळाच्या के.व्ही.पटेल कृषि महाविद्यालयाच्या मृदाशास्त्र विभागातर्फे प्रगत कौशल्य प्रशिक्षण अंतर्गत शेतीसाठी मूलभूत अन्नद्रव्य व्यवस्थापन या विषयावर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न झाली.

     के.व्ही.पटेल कृषी महाविद्यालय शहादा येथे अंतीम वर्षाच्या विद्यार्थ्यासाठी कार्यशाळा आयोजीत करण्यात आली होती.कार्यक्रमाचे प्रास्तविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रकाश पटेल यांनी केले.कार्यशाळेसाठी उपस्थित असलेले मार्गदर्शक विषयतज्ञ डॉ. प्रकाश पोपट सावंत(यारा फर्टिलायझर,जळगांव) यांनी शाश्वत शेतीसाठी मूलभूत अन्नद्रव्यांची गरज, महत्वाविषयी माहिती दिली.मुख्यतः केळी या पिकासाठी घ्यावयाची दक्षता याबाबत विस्तृत चर्चा केली. विद्यार्थ्यांसाठी भविष्यातील कृषि उद्योगातील संधी या विषयांवर मार्गदर्शन केले.कार्यशाळेचे आयोजन डॉ. भरत सी. चौधरी यांनी केले.आभार प्रदर्शन प्रा.अनिल पाटील यांनी केले.सदर कार्यशाळेत महाविद्यालयाचे प्राध्यापक वृंदासह अंतीम वर्षाचे विद्यार्थी व विद्यार्थीनी उपस्थित होते.कार्यशाळेसाठी मंडळाचे अध्यक्ष दीपकभाई पाटील, उपाध्यक्ष जगदीश पाटील, सचिव श्रीमती कमलताई पाटील, समन्वयक प्रा.मकरंद पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मयूरभाई दीपक पाटील, प्राचार्य डॉ.पी.एल.पटेल यांचे मार्गदर्शन लाभले.

Post a Comment

0 Comments

|