Header Ads Widget


डोंगरगांव रोडवरील आई म्हाळसादेवी मंदिरामध्ये गुरु पौर्णिमेच्या औचित्य साधून विविध कार्यक्रम घेण्यात आले. ..

 


नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी/प्रा.गणेश सोनवणे:शहादा येथील आई म्हाळसादेवी मातेचे मंदिरात विविध कार्यक्रम घेण्यात आले. सुरुवातीला श्री स्वामी समर्थ साप्ताहिक सेवा केंद्र म्हाळसा माता मंदिर यांच्या मार्फत गुरु पूजनाचे आयोजन करण्यात आले होते. गुरुपूजनाच्या प्रारंभ सकाळी साडेदहा वाजता नैवेद्य आरती व स्वामी चरित्र सारामृत याच्या सामूहिक पठनानंतर घेण्यात आला. गुरुपुजन व गुरुपद देण्याचे काम केंद्रातील सेवेकरी धनश्री चौधरी व पल्लवी चौधरी यांनी केले. आई म्हाळसा देवी मंदिरात दर शुक्रवारी दिंडोरी प्रणित स्वामी समर्थ केंद्रामार्फत साप्ताहिक आरतीचे आयोजन करण्यात येते. साप्ताहिक आरती सुरू झाल्याने परिसरातील नागरिकांचे सुविधा झाली आहे त्याचबरोबर भाविकांमध्ये समाधान देखील व्यक्त होत आहे. भाविकांचा मागणीनुसारच गुरुपौर्णिमेच्या औचित्य साधन गुरुपूजन करण्यात आले. 

     सायंकाळी आई म्हाळसादेवीची नित्यनियमाने आरती करण्यात आली . आरती नंतर लागलीच सामुदायिक भंडारा प्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. भंडारा प्रसाद लोकवर्गणीतून करण्यात आला होता. भंडारा प्रसादासाठी महिला , पुरुष ,बालगोपाल मोठ्या संख्येने उपस्थित होते. दर पौर्णिमेला व अमावस्येलाआई म्हाळसा देवी चां मूर्तीस सुश्रभूत करण्यात येवून नवी साडी परिधान करण्यात येते. देवीची सुश्रुषा करण्याचे काम मंदिराचे विलास रेड्डी हे पुजारी करत असतात. श्री स्वामी समर्थ केंद्र मार्फत आयोजित गुरुपूजन व भंडारा या कार्यक्रमासाठी मंदिर सेवा समितीचे अध्यक्ष व सर्व सन्माननीय सदस्य यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments

|