Header Ads Widget


वसंतराव नाईक महाविद्यालयात व्यवसाय प्रशासन व्यवस्थापन मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न...

 


     नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी /प्रा. गणेश सोनवणे:शहादा येथील वसंतराव नाईक कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात अंतर्गत गुणवत्ता आश्वासन कक्ष व अर्थशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने व्यवसाय प्रशासन व्यवस्थापन मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. संतोषकुमार पाटील कार्यक्रमाचे अध्यक्ष तर सूरत (गुजरात ) येथील व्यवसाय प्रशासन व्यवस्थापक हितेश ठाकरे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.


  महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. संतोषकुमार पाटील यांनी विधिवत या कार्यशाळेचे उद्घाटन करून विद्यार्थ्यांना हिताच्या चार गोष्टी सांगितल्या. कार्यशाळेचे मुख्य संचालक हितेश ठाकरे यांनी पाॅवर पॉइंट सादरीकरणातून विद्यार्थ्यांना एमबीए या कोर्सची अभ्यासपूर्ण सखोल अशी माहिती करून दिली. यात प्रामुख्याने त्यांनी पदवीनंतर काय? काय करावे काय करू नये? मिळणाऱ्या संधी, शक्यता, आर्थिक नियोजन कसे करावे? प्रवेश परीक्षेची तयारी कशी करावी? देश विदेशात प्रवेशाच्या शक्यता या व यासंदर्भातल्या अनेक प्रश्नांसंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले

Post a Comment

0 Comments

|