Header Ads Widget


पूज्य साने गुरूजी कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी वृक्षदिंडी व पथनाट्यातून केली जनजागृती. ...

 


नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी/प्रा.गणेश सोनवणे:पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या कनिष्ठ महाविद्यालयातर्फे वृक्षदिंडी कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.महाविद्यालय ते लोणखेडा गावातील मेनरोडसह विविध भागात वृक्षदिंडी व पथनाट्यातून जनजागृती करण्यात आली.

      वृक्ष दिंडीचा प्रारंभ महाविद्यालय परिसरात प्राचार्य डॉ. एम.के. पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.उपप्राचार्या प्रा.श्रीमती कल्पना पटेल, पर्यवेक्षक प्रा.के.एच.नागेश,प्रा.व्ही. सी.डोळे यांच्या हस्ते वृक्ष लागवड करून व दिंडीची पूजा करून करण्यात आली. वृक्षदिंडीच्या रॅलीला महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारापासून लोणखेडा गावातील मेनरोड,परिसराचे भाग्यविधाते कै.अण्णासाहेब पी.के.पाटील पुतळ्याजवळ (statue of motivation ), रोहीदास नगर, जिल्हा परिषद शाळेकडून,लोणखेडा चाररस्ता या मार्गाने दिंडी काढण्यात आली. विद्यार्थ्यांनी ठिकठिकाणी वृक्ष संवर्धन, पर्यावरण रक्षण या विषयांवर पथनाट्य सादर केले. विद्यार्थ्यांनी विविध घोषणा देत, गायनाच्या माध्यमातून टाळ वाजवून जनजागृती केली.वृक्ष लागवड करून संवर्धन करणे आवश्यक आहे तरच मानवाचे रक्षण होईल असा संदेश देत जनजागृतीचा प्रयत्न केला. यावेळी उपस्थित गावकरी बंधू- भगिनींना रोपे भेट देण्यात आले .११वी विज्ञान शाखेतील नेहा महिरे, कृपा पवार, मुद्रा रामराजे, वेदांत, प्रणव ,गौरव, दर्शन पटेल यांसह अनेक विद्यार्थ्यांनी पथनाट्यात सहभाग घेतला.उपप्राचार्य प्रा. श्रीमती कल्पना पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली वृक्षदिंडीचे आयोजन करण्यात आले.यशस्वीतेसाठी वृक्ष लागवड व संवर्धन समिती संयोजिका प्रा. उर्मिला पावरा, प्रा.रंजना गावित,प्रा. शैलेंद्र पाटील, प्रा. ममता पाटील व सर्व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. याप्रसंगी कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व सहकारी प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.या उपक्रमाचे कौतुक मंडळाचे अध्यक्ष दीपकभाई पाटील, उपाध्यक्ष जगदीश पाटील, सचिव श्रीमती कमलताई पाटील,समन्वयक प्रा.मकरंद पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मयूरभाई दीपक पाटील, प्राचार्य डॉ.एम. के.पटेल यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments

|