Header Ads Widget


शेवाळी(दा.)गावाजवळील जुन्या महामार्गावरील पूल बनला धोकादायक; तात्काळ दुरुस्ती करण्याची ग्रामस्थांची व वाहनचालकांची मागणी.

 


साक्री प्रतिनिधी/अकिल शहा :
साक्री तालुक्यातील जुन्या राष्ट्रिय महामार्ग क्रमांक ६ वरील वसलेल्या शेवाळी गावाजवळून जाणाऱ्या रस्त्यावरील पूल अत्यंत धोकादायक स्थितीत असल्यामुळे वाहनचालकांना आपला प्रवास जीव मुठीत धरून करावा लागत आहे. हा रस्ता नंदूरबार,साक्री,धुळे, मालेगांव जाण्यासाठी पर्यायी मार्ग आहे या रस्त्यावरून नेहमी बसेस व तसेच अनेक छोटे मोठे वाहनांची रेलचेल असते अशा वेळी या रस्त्यावरील पुलावरुन वाहतूक करतांना अपघात होण्याची दाट शक्यता आहे. या पुलावरील संरक्षण भिंत अर्थात कठडे तुटल्यामुळे अपघात झाल्यास वाहन खाली कोसळण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. याच पुलाखालून शाळकरी विद्यार्थी आपले शालेय शिक्षण घेण्यासाठी रस्त्याला बाजूला असलेल्या माध्यमिक विद्यालयात ये जा करीत असतात व तसेच जवळच असलेल्या अमरधाम कडे अंत्यविधीसाठीही ग्रामस्थांना पुलाखालून जावे लागते. गावातील बहुतेक शेतकऱ्यांची शेती त्याच मार्गाला असल्याने त्यांनाही रोज याच पुलाखालून ये जा करावे लागते अशा वेळी एखाद्या वाहनचालकाचा वाहनावरील ताबा सुटून अपघात झाल्यास वाहन पुलावरून खाली कोसळल्यास मोठी जीवितहानी होवून मोठा अनर्थ होईल तेंव्हा प्रशासन व राष्ट्रिय महामार्ग प्राधिकरणला जाग येईल का? असे वाहनचालक व ग्रामस्थांच्या वतीने प्रतिक्रिया येत आहेत. मागील काही महिन्यांपूर्वी या प्रश्नाकडे प्रशासनाचे व राष्ट्रिय महामार्ग प्राधिकरण च्या अधिकाऱ्यांचे लक्ष केंद्रीत करण्यासाठी प्रा.प्रकाश सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांच्या वतीने हा प्रश्न तात्काळ सोडवा हि मागणी करीत प्रशासन व राष्ट्रिय महामार्ग प्राधिकरण यांना इशारा देण्यात आला होता त्यावेळी सर्व वृत्तपत्रात या पुलाविषयी बातमी प्रसिद्ध होताच तात्पुरते डागडुजी करून फक्त जखमेवर मलम लावण्याचे काम राष्ट्रिय महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनी केले आहे परत आज या पुलाची व पुलावरील रस्त्याची जैसे थे स्थिती असल्याने विद्यार्थी, गावकरी, वाहनचालक यांच्या वतीने या पुलाचा व पुलावरील रस्त्याचा प्रश्न तात्काळ सोडवा अशी मागणी केली जात आहे. विशेष म्हणजे या रस्त्यावरून नेहमी लोकप्रतिनिधी ये जा करीत असतानांही त्यांनीही या कडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे की काय असा प्रश्न जनसामान्यातून केला जात आहे.नवनियुक्त खासदार अॅडवोकेट गोवाल पाडवी यांनीही ही समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करावेत व सबंधित अधिकाऱ्यांनी या कडे लक्ष देवून पुलाचे काम करून द्यावे अशी मागणी परिसरातील नागरिकांसह वाहनधारक करीत आहेत.





Post a Comment

0 Comments

|