Header Ads Widget


कॉ. कै. श्रावण वेडु सोनवणे ऊर्फ जिभाऊ यांच्या पुण्यतिथी निमित्त तामसवाडी विद्यालयातर्फे आदरांजली अर्पण...





साक्री प्रतिनिधी/अकिल शहा:खान्देश एज्युकेशन सोसायटी, तामसवाडी च्या माध्यमिक विद्यालय तर्फे संस्थेचे अध्यक्ष प्रा. प्रकाश सोनवणे यांचे वडील व संस्थेचे सदश्य कै. श्रावण वेडु सोनवणे यांच्या पुण्यतिथीदिनी त्यांना दिनांक 27 जुलै 2024 रोजी आदरांजली वाहण्यात आली. 

या कार्यक्रमास संस्थेचे प्रशासकीय अधिकारी मा. आबासाहेब निंबा साळुंके हे उपस्थित होते. आपल्या शाळेप्रती कै. जिभाऊचे असलेले प्रेम व निष्ठा यांची महती विषद केली. आपल्या गावात माध्यमिक विद्यालय नाही म्हणुन गावातील मुले शिकत नाही, त्यांनी पुढे शिकावे व आपल्या गावाचा नावलौकिक व्हावा या उदात्त हेतूने आपले मुंबईतील ज्येष्ठ सुपुत्र प्रा.प्रकाश सोनवणे यांच्या मदतीने माध्यमिक विद्यालय सुरू केले व आज त्याचा फायदा तामसवाडी गाव व परिसरातील विद्यार्थ्यांंना होत आहे,हे सांगताना मला आनंद होत आहे असे प्रतिपादन त्यांनी आपल्या भाषणातून केले.ते पुढे म्हणालेत की आपल्या प्रबळ शक्तीच्या जोरावर मनुष्य काय करू शकतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे कै. कॉम्रेड श्रावण जिभाऊ हे होय.

शेवाळी गावात आपला बलुतेदारी व्यवसाय सांभाळून त्यांनी आपली स्वताची मुले शिकवलि, त्यांना उच्च शिक्षित केले व सातासमुद्रापार पाठवले असे असामान्य कर्तृत्व कै. श्रावण जिभाऊ यांनी केले याचा आम्हास सार्थ अभिमान आहे. त्यांच्याच प्रेरणेने आज गावातील व परिसरातील शेकडो युवक आपली रोजी रोटी कमऊन आपल्या आई वडीलांचि सेवा करीत आहेत. शाळेतील आम्ही सर्व कर्मचारी शाळेमुळे सुखी आहोत. कै.श्रावण जिभाऊ हे कॉम्रेड होते. तसेच ते शाहीर होते. श्रमिकांचा कष्ठकरी मजुरांचा आवाज आपल्या पहाडी आवाजात कलापथकातूंन ते जेव्हा सादर करीत तेव्हा समोरचा श्रोता मंत्रमुग्ध होत असे. आया बहिणींची दुःखे जेव्हा ते आपल्या गाण्यातून सादर करीत तेव्हा उपस्थित स्त्रीया डोळ्याना पदर लावीत.अशा महान दूरदृष्टी असलेल्या कै. जिभाऊ यांना आम्ही सर्वजण त्यांच्या प्रतिमेसमोर नतमस्तक होत आहोत व त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहत आहोत असे शेवटी मा.आबासाहेब यांनी कै. कॉम्रेड श्रावण जिभाऊ यांच्या प्रति आपल्या भावना व्यक्त केल्यात. कार्यक्रमाच्या सुरुवातीस कै. कॉम्रेड श्रावण जिभाऊ यांच्या प्रतिमेस मा. आबासाहेब साळुंके व सर्व कर्मचाऱ्यांनी पुष्प वाहीले तद्नंतर शाळेतील मुलांनी आपल्या गीतातून कै. जिभाऊ यांच्या पुण्यतिथीदिनी निमित्ताने आदरांजली वाहिली.विद्यालयाचे मुख्याध्यापक मा.श्री.कैलास जाधव यांनी उपस्थितांचे आभार मानलेत.

Post a Comment

0 Comments

|