Header Ads Widget


राष्ट्रीय हरित सेना अंतर्गत अमृत वृक्ष आपल्या दारी व एक झाड आईचे नाव कार्यक्रमाचे आयोजन...

 


नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी/प्रा. गणेश सोनवणे:शहादा येथील दादासाहेब भवन शंकर भामरे माध्यमिक विद्यालयात राष्ट्रीय हरित सेना अंतर्गत अमृत वृक्ष आपल्या दारी व एक झाड आईचे नाव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.वनपरिक्षेत्र अधिकारी शहादा व सामाजिक वनीकरण विभाग क्षेत्र शहादा यांचे संयुक्त विद्यमाने एक झाड आईचे नाव अंतर्गत विद्यार्थ्यां मार्फत शाळेच्या आवारात वृक्ष लागवड करण्यात आले.विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने या उपक्रमात सहभाग घेतला होता.  यावेळी प्रादेशिक वनक्षेत्रपाल आशुतोष यांनी वृक्ष लागवड इकोसिस्टीम जैव विविधतावाढते.एक झाड आईच्या नावे या उपक्रमाची तसेच अमृत वृक्ष आपल्या दारी याबाबत सखोल मार्गदर्शन केले.वनक्षेत्रपाल रामकृष्ण लामगे यांनी विद्यार्थ्यांना वृक्ष लागवड ही वैयक्तिक जबाबदारी व काळाची गरज असून संवर्धन करणे गरजेचे आहे असे आवाहन केले.  कार्यक्रमात मुख्याध्यापक पी.यू.ठाकरे वनपाल साधना वाडीले रूपाली मोरे वनरक्षक भूपेश तांबोळी दिपाली पाटील संतोष राठोड स वन विभागाचे व सामाजिक वनीकरणाचे कर्मचारी अधिकारी उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी विद्यालयाचे इको क्लबचे शिक्षकांनी योगदान दिले.

Post a Comment

0 Comments

|