Header Ads Widget


जायट्स ग्रुप तर्फे शहरातील महावीर नगरात महादेव मंदिर परिसरात स्व.जगदीश पाटील यांच्या स्मृतिप्रत्यर्थ वृक्षारोपण करण्यात आले.


 नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी/ प्रा. गणेश सोनवणे:शहादा येथील जायट्स ग्रुप तर्फे शहरातील महावीर नगरात महादेव मंदिर परिसरात स्व.जगदीश पाटील यांच्या स्मृतिप्रत्यर्थ शहादा जायट्स ग्रुप अध्यक्ष डॉक्टर विवेक पाटील व गटशिक्षण अधिकारी डॉक्टर योगेश सावळे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.यावेळी डॉक्टर विवेक पाटील यांनी महावीर नगर परिसरातील नागरिकांना वृक्षारोपण ही काळाची गरज असून त्याचे संगोपन करणे आवश्यक आहे.प्रत्येकाने आपले कर्तव्य समजून एक झाड तरी लावून जगवले पाहिजे.स्वतःचे कर्तव्य समजून वृक्षारोपण उपक्रमावर भर देणे गरजेचे आहे असे आव्हान केले.या व्यतिरिक्त शहादा जायन्ट्स ग्रुपचे माजी अध्यक्ष सतीश जव्हेरी यांनी देखील मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाला सहेली ग्रुपच्या अध्यक्ष स्वाती पाटील डॉक्टर सचिन चौधरी डॉक्टर दीपा चौधरी डॉक्टर लकेश पाटील इस्माईल राजा के.के.सोनार सह जायन्ट्स ग्रुपचे सदस्य व महावीर नगरातील प्रतिष्ठित नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी सचिव अजबसिंग गिरासे यांनी केले.उपस्थितांचे आभार कैलास भावसार यांनी व्यक्त केले.

Post a Comment

0 Comments

|