Header Ads Widget


वसंतराव नाईक माध्यमिक विद्यालयात शिक्षण सप्ताह उत्साहाने साजरा ...

 


नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी/प्रा. गणेश सोनवणे:शहादा येथील वसंतराव नाईक माध्यमिक विद्यालयात दिनांक २२ जुलै ते २८ जुलै पर्यंत शिक्षण सप्ताह उत्साहाने साजरा करण्यात आला.या सप्ताहात विद्यार्थ्यांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.मुख्याध्यापक महेंद्र मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपमुख्याध्यापक जे.एम.पाटील उपप्राचार्य जे.बी.पवार पर्यवेक्षक अनिल खेडकर पर्यवेक्षक खान ए.ए.यांच्या उपस्थितीत स्वतःची सुरुवात करण्यात आली.या सप्ताहात अध्ययन-अध्यापन मूलभूत संख्याज्ञान क्रीडा दिवस कौशल्य डिजिटल सह कार्यक्रम होऊन २८ जुलै रोजी रोपे वाटून शिक्षण सप्ताहाच्या समारोप करण्यात आला. क्रीडा दिनाच्या दिवशी विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते तर उपशिक्षक पी.एम.जाधव यांनी विद्यार्थ्यांना मनोरंजनात्मक कार्यक्रम सादर केले .विद्यार्थ्यांनी मनमुराद पणे आनंद लुटला.संस्थेचे विभागीय सचिव प्राध्यापक संजय जाधव व वर्षा जाधव यांनी शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments

|